Uorfi Javed : उर्फीची कपड्याची बॅग घेऊन उबेर ड्रायव्हर पळाला, दारू पिऊन... | Model Uorfi Javed Complained about Uber driver on twitter Users reacted | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uorfi Javed
Uorfi Javed : उर्फीची कपड्याची बॅग घेऊन उबेर ड्रायव्हर पळाला, दारू पिऊन...

Uorfi Javed : उर्फीची कपड्याची बॅग घेऊन उबेर ड्रायव्हर पळाला, दारू पिऊन...

मॉडेल उर्फी जावेद आपल्या अतरंगी स्टाईलमुळे कायमच चर्चेत असले. पण आता तिने सोशल मीडियावर एक तक्रार केली आहे. तिच्या या तक्रारीची सध्या चर्चा सुरू आहे. कॅब बुकींगचा आलेला विचित्र अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ट्वीट करत उर्फीने सांगितलं, "उबेरसोबत माझा अनुभव वाईट होता. दिल्लीकडे विमानतळावर जाण्यासाठी मी ६ तासांसाठी कॅब बुक केली. विमानतळावर जाताना जेवणासाठी थांबले असताना ड्रायव्हर गाडीतल्या माझ्या सामानासह गायब झाला. माझ्या एका मित्राच्या हस्तक्षेपानंतर जवळपास एक तासानंतर जेव्हा तो परतला, तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता. त्याला नीट चालताही येत नव्हतं."

उर्फी पुढे म्हणाली, "आम्ही त्याला तू कुठे आहेस विचारलं असता, त्याने आपण पार्किंगमध्ये असल्याचं सांगितलं. पण तो खोटं बोलत होता, त्याचं लोकेशन आमच्यापासून एक तास पुढे असल्याचं दाखवत होतं. त्याला बऱ्याच वेळा कॉल करूनही तो ऐकत नव्हता. शेवटी माझ्या एका मित्राला या प्रकरणी मध्यस्थी करावी लागली."

उर्फीच्या या तक्रारीची उबेरनेही दखल घेतली आहे. तुमचा अनुभव आम्हाला पर्सनली मेसेज करून सांगा, आम्ही तुमची समस्या दूर करू असं ट्वीट उबेरने आपल्या अधिकृत खात्यावरुन केलं आहे. उर्फीच्या या ट्वीटवर अनेक युजर्सनी तिच्या बाजूने कमेंट्स केल्या आहेत. उबेरचा आपल्यालाही वाईट अनुभव आला असल्याचं अनेक युजर्सने सांगितलं. उबेरने यातल्या बहुतांश युजर्सच्या कमेंट्सची दखल घेतली आहे.

टॅग्स :Tv Entertainment News