Superstar Singer 2: 'सगळ्यांच्या डोळ्यात होतं पाणी!' मोहम्मद फैज ठरला विजेता!|Mohammad Faiz winner Superstar Singer 2 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Superstar Singer 2

Superstar Singer 2: 'सगळ्यांच्या डोळ्यात होतं पाणी!' मोहम्मद फैज ठरला विजेता!

Superstar Singer 2: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये सध्याच्या घडीला प्रचंड लोकप्रिय झालेला रियॅलिटी शो म्हणून सुपरस्टार सिंगर 2 चे नाव घेतले जाते. (Tv Entertainment News) त्याच्या दुसऱ्या सीझनच्या विजेत्यांची नावं समोर आली आहे. ग्रँड फिनालेमध्ये कोण विजयी होणार याची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. अखेर राजस्थानच्या मोहम्मद फैजच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Social media news) प्रेक्षकांनी विक्रमी मतांनी त्याला विजेता म्हणून निवडून दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नावाची चर्चा होती. राजस्थानातील जोधपूर या शहरात राहणारा मोहम्मद हा 14 वर्षांचा आहे.

एका मुलाखतीमध्ये मोहम्मदनं आपल्या विजयाबद्दल सांगितलं की, जेव्हा मला विजेता म्हणून घोषित करण्यात आले तेव्हा माझ्याजवळचे अनेकजण रडत होते. त्यांना खूप आनंद झाला होता. तो मला काही शब्दांतून मांडता येणार आहे. त्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच मला हे यश मिळाले असे मी सांगु शकतो. मेहनत, संघर्ष आहे. चांगल्या कलाकाराच्या पाठीशी चाहते नेहमीच असतात. हे मला आतापर्यतच्या परफॉर्मन्समुळे दिसून आले आहे. देशात गायकीच्या क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला सुपरस्टार सिंगरचे नाव मोठे आहे. अशा शोमध्ये विजेतेपद मिळवणे हे माझ्यासाठी अभिमानाची बाब होती.

आईनं मला उचलून घेत माझं कौतूक केलं. माझे वडील हे सध्या भारताबाहेर आहेत. मी त्यांच्याशी फोनवरुन बोललो. त्यांना खूप आनंद झाला आहे. ते मला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे. मी त्यांची वाट पाहतो आहे. माझ्या भाऊ बहिणींच्या डोळ्यात पाणी होते. त्यांचा आनंद मी समजू शकतो. हे सारं काही स्वप्नवत वाटायला लागते. माझ्या जवळच्या लोकांमुळे मला माझ्या यशाची जाणीव झाल्याची भावना मोहम्मदनं यावेळी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: स्मार्टफोनमुळे डोळ्यांची जळजळ? गणपतीला वाहिलेल्या या पत्रीचा रस देईल आराम

खरं सांगतो माझी कुणाशीही स्पर्धा नव्हती. मी कुणालाही माझा विरोधक मानलं आहे. आपण फक्त गायन करायचं, त्याचा आनंद घ्यायचा. परिक्षकांनी सांगितलेल्या चुकांवर काम करुन त्या पुन्हा होणार नाही याची काळजी मी घेतली. याचा फायदा मला स्पर्धेदरम्यान झाला. त्यामुळे मला विजयी होता आले असेही मोहम्मदनं यावेळी सांगितले.

हेही वाचा: ग्लोबल बाप्पा : न्यूयॉर्क ते दुबई; गौरी पूजनाचे मुहूर्त

Web Title: Mohammad Faiz Winner Superstar Singer 2 Social Media Viral Reaction Family Support

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..