बेबी शॉवरमध्ये सुरवीन चावलाचा हटके अंदाज

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 7 March 2019

गार्डन परिसरात केलेली फुलं आणि लाईटींगच्या सजावटीत उभी असलेल्या सुरवीन चेहऱ्यावर आईपणाची आनंद झळकत होता.

बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला ही लवकरच गुड न्युज देणार आहे. सध्या ती तिचा प्रेग्नन्सी टाइम साजरा करताना दिसत आहे. सोशल मिडीयावर सुरवीनने तिच्या प्रेग्नन्सीचे अनेक फोटो अपलोड केले आहेत. नुकताच तिने तिच्या 'बेबी शॉवर'चे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेत.

गार्डन परिसरात केलेली फुलं आणि लाईटींगच्या सजावटीत उभी असलेल्या सुरवीन चेहऱ्यावर आईपणाची आनंद झळकत होता. सुरवीन गर्भवती असल्यापासून ती अनेक कार्यक्रमांमध्ये ड्रेस व गाऊनमध्ये दिसली आहे. पण या 'बेबी शॉवर'मध्ये तिने 'रॉ मँगो'ची पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. पुर्णपणे भारतीय वेशात ती आली होती. या वेगळ्या अंदाजात सुरवीनने 'बेबी शॉवर'चे फोटो फॅन्ससाठी शेअर केले आहेत.

 

 

 

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

What joy looks like ..... Beautiful jewellery by @satyanifinejewels @devpurbiyaphotography

A post shared by Surveen Chawla (@surveenchawla) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mom to be actress surveen chawlas baby shower photos