esakal | Money Heist 5: नेटकऱ्यांना दिसले विराट कोहली, बॉबी देओल; तुम्ही पाहिलंत का?
sakal

बोलून बातमी शोधा

money heist 5 seson

Money Heist 5: नेटकऱ्यांना दिसले विराट कोहली, बॉबी देओल; तुम्ही पाहिलंत का?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

जगभरातील सर्वांत लोकप्रिय वेब सीरिज 'मनी हाइस्ट'चा पाचवा Money Heist 5 सिझन नुकताच प्रदर्शित झाला. ३ सप्टेंबर रोजी या पाचव्या सिझनचे पहिले पाच एपिसोड नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाले. ही सीरिज प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्यावरून भरभरून मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत. एकीकडे पाचव्या सिझनमध्ये टोकियोच्या मृत्यूमुळे काहीजण नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे याच सिझनमध्ये काही जणांना चक्क क्रिकेटर विराट कोहली Virat Kohli आणि अभिनेता बॉबी देओल Bobby Deol दिसला आहे. आता स्पॅनिश वेब सीरिजमध्ये विराट आणि बॉबी कसे दिसतील, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी नेटकऱ्यांचे भन्नाट पोस्ट एकदा पहाच..

लष्करी हेलिकॉप्टरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मार्सेलीला अधिकाऱ्यांचा एक गट पकडण्याचा प्रयत्न करतो. लँडिंग केल्यानंतर, अधिकारी त्याला पकडण्यापूर्वीच तो पळून जातो. अधिकाऱ्यांपैकी एक जण शेतकऱ्याला प्रश्न विचारत असतो. त्याला पाहून नेटकऱ्यांना विराट आणि बॉबीची आठवण झाली. 'अखेर बॉबी देओलला सर्वांत मोठा प्रोजेक्ट मिळाला', अशी मजेशीर कमेंट काहींनी त्यावर केली. तर 'मनी हाइस्टमध्ये विराटने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'विराट किंवा बॉबीचा मुलगा असाच दिसेल', अशा भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा: Money Heist 5: टोकियोच्या मृत्यूनंतर चाहते भावूक; ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

या सिझनचे पुढील पाच एपिसोड्स हे तीन महिन्यांनंतर ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. 'मनी हाइस्ट ५'चा ट्रेलर प्रदर्शित होताच जगभरातील चाहत्यांनी, प्रेक्षकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला. आगळ्यावेगळ्या विषयावरील मांडणी असणा-या मनी हाईस्टनं जगभरातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. यातील प्रोफेसरची भूमिका करणारा अल्वारो मोर्ते (alvaro morte) हा प्रचंड लोकप्रिय झाला. केवळ परदेशातच नाही तर भारतातही या वेब सीरिजचे अनेक चाहते आहेत.

loading image
go to top