Miguel Ferran
Miguel Ferran esakal

Miguel Ferran : मनी हाईस्टचा 'रिओ' भारतात आला! आता SBI लुटून नेतो का? नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

मनी हाईस्टमधील अभिनेता मिगुल हेरन ज्यानं मनी हाईस्टमध्ये रियोची भूमिका साकारली होती तो दिल्लीच्या विमानतळावर आला आणि सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली.

Money Heist Fame Miguel Ferean Delhi Airport photo : ज्या वेबसीरिजनं साऱ्या जगाला वेडं केलं होतं त्या मनी हाईस्टची लोकप्रियता काय आहे हे ती मालिका पाहिलेल्या प्रेक्षकांना चांगलीच ठाऊक आहे. या मालिकेतील पात्रं ही अजुनही चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहेत. त्यांच्यासंबंधीच्या वेगवेगळया बातम्या या नेहमीच चाहत्यांच्या गॉसिपिंगचा विषय असतो.

मनी हाईस्टमधील अभिनेता मिगुल हेरन ज्यानं मनी हाईस्टमध्ये रियोची भूमिका साकारली होती तो दिल्लीच्या विमानतळावर आला आणि सोशल मीडियावर चर्चेला सुरुवात झाली. तो फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून वेगवेगळया प्रतिक्रिया सुरु झाल्या. त्यात एकानं तर रियो आता भारतातील एसबीआय बँक लुटायला आला की काय असा प्रश्न त्याला विचारला आहे. रियोची भारतातील प्रसिद्धी मोठी आहे.

Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या मनी हाईस्ट नावाच्या मालिकेनं वेब मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडवून दिली होती. त्याची लोकप्रियताही मोठी होती. त्याच्या प्रत्येक सीझनला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. असा परिस्थितीत त्या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांकडून मिळालेली पोचपावती कौतूकास्पद होती. रियो हा दिल्लीच्या विमानतळावर येताच त्याला पापाराझ्झींनी घेराव घातला.

Miguel Ferran
Javed Akhtar : 'जावेदजी तुम्ही तर घरात घुसून मारलं!' तुम्हाला मानलं, चक्क कंगनाकडून तोंडभरून कौतूक

येत्या काळात मिगून हा एका आगळ्या वेगळ्या विषयांवरील मालिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. त्या मालिकेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. मनी हाईस्टपासून कमालीची लोकप्रियता मिळालेल्या मिगुनच्या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडला आहे.

Miguel Ferran
Money Heist : 'मनी हाईस्ट'मधल्या मोनिकाचा जलवा Esther Acebo

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com