Money Heist Season 5 Part 2: ट्रेलर प्रदर्शित होताच मीम्सचा वर्षाव | Netflix | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

alvaro morte

Money Heist Season 5 Part 2: ट्रेलर प्रदर्शित होताच मीम्सचा वर्षाव

स्पॅनिश क्राईम थ्रिलर सिरीज मनी हाईस्ट त्याच्या शेवटच्या सिझनसह नेटफ्लिक्सवर परत येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'मनी हाईस्ट'च्या पाचव्या सिझनचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनचा पहिला भाग ३ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता. पहिल्या भागानंतर आता चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मनी हाईस्ट ५च्या दुसऱ्या भागाच्या ट्रेलरवरून सोशल मीडियावर मीम्ससुद्धा व्हायरल होऊ लागले आहेत.

नवीन ट्रेलरमध्ये प्रोफेसर अॅक्शन सीन्स करताना दिसत आहेत. सिझन ५ च्या व्हॉल्यूम १ मध्ये टोकियोच्या मृत्यूनंतर, प्रोफेसर शेवटी बँक ऑफ स्पेनमध्ये त्याच्या टीममध्ये सामील होण्याचा निर्णय घेतो. तो बँकेच्या आत जाताना दिसतो. ट्रेलरमध्ये पुढे, प्रोफेसरची साथीदार अॅलिसिया पळून गेली आहे आणि सैन्य ओलिसांना सोडवण्यासाठी पुढे येते. व्हिडिओ क्लिपमध्ये रिओ, डेन्व्हर, स्टॉकहोम आणि लिस्बन यांसह इतरांनाही दाखवलं आहे.

हेही वाचा: सूर्यवंशी चित्रपटात दिसणार 'महेंद्रसिंह धोनी'?

सीझन ५ चा दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी त्यावर आश्चर्य व्यक्त करत काही मिम्स ट्विटरवर शेअर केलेत. 'देवा हे फ्लॅशबॅक मला नेहमीच त्रास देतात.' तर 'ओह माय गॉड मनी हाइस्ट ५ चा ट्रेलर खूपच दमदार आहे', असे मिम्स नेटकऱ्यांनी पोस्ट केले आहेत.

हिंदुस्तान टाईम्सशी या शोबद्दल आणि भारतातून मिळालेल्या प्रेमाबद्दल बोलताना अभिनेता अल्वारो म्हणाला ,"मला खूप दिवसांपासून भारतात जाण्याची इच्छा आहे. या शोला देशातून मिळालेला प्रतिसाद अगदीच अविश्वसनीय आहे." त्याबद्दल त्यांनी पुढे कृतज्ञता व्यक्त केली. पाचव्या सिझनचा दुसरा भाग 3 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Money Heist Season 5 Part 2 Trailer Memes Are Breaking In

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top