Tarak Mehta: मला आत्महत्या करावीशी वाटत होती... तारक मेहता मधील बावरीचा पुन्हा खळबळजनक खुलासा

बावरी म्हणजेच अभिनेत्री मोनिका भदोरियाने पुन्हा एक खळबळजनक खुलासा केलाय, यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
monika bhadoriya from taarak mehta ka ooltah chahshmah allegation over show makers
monika bhadoriya from taarak mehta ka ooltah chahshmah allegation over show makersSAKAL

Monika Bhadoriya on Taarak Mehta Ka Ooltah Chashmah News: TRP आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेला कोणाची नजर लागली आहे कळायला मार्ग नाही.

तारक मेहता मधील अनेक कलाकार शोचे निर्माते असित मोदी आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप करत आहेत.

अशातच तारक मेहता मधील.. बावरी म्हणजेच अभिनेत्री मोनिका भदोरियाने पुन्हा एक खळबळजनक खुलासा केलाय, यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

(monika bhadoriya from taarak mehta ka ooltah chahshmah allegation over show makers)

monika bhadoriya from taarak mehta ka ooltah chahshmah allegation over show makers
Akshay Bhalerao: चपाती बरोबर जात का खात नाही? अक्षय भालेराव प्रकरणावर हास्यजत्रेच्या कलाकाराची जळजळीत पोस्ट

मोनिकाने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ती अनेक कौटुंबिक समस्यांमधून गेली आहे. काही दिवसांतच तिने आई आणि आजीचं छत्र गमावलं आहे.

आई आणि आई दोघेही तिच्या आयुष्याचा आधार होते आणि त्यांनी तिला मोठ्या प्रेमाने वाढवले. या दु:खातून ती कधीच बाहेर पडू शकलो नाही हा मोठा धक्का अनुभवल्यावर तिला तिचे आयुष्य संपल्यासारखे वाटले.

monika bhadoriya from taarak mehta ka ooltah chahshmah allegation over show makers
Shruti Marathe चा नवराही आहे सुप्रसिद्ध अभिनेता, तुम्हाला माहीतीये का?

मोनिकाने पुढे खुलासा केला की... हे आघात त्यावेळचे होते जेव्हा मोनिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेशी संबंधित होती. मालिकेच्या सेटवर तिच्यावर खूप अत्याचार झाले.

मोनिकाच्या घरची ही बिकट अवस्था आणि त्यात शोमध्ये होणार्‍या छळामुळे ती मानसिकरित्या कोसळली होती. या गोष्टींमुळे मोनिका आत्महत्या करायला निघाली होती.

मोनिकाच्या आई - वडिलांच्या निधनानंतर तिला पैसे देण्यात आल्याचं निर्मात्यांनी सांगितलं. या गोष्टी मोनिकाला टोचत होत्या आणि हादरवून सोडत होत्या.

मोनिकाने शेवटी खुलासा केला की.. एक दिवस मी माझ्या आई-वडिलांना तारक मेहता शोच्या सेटवर घेऊन येईन, असे माझे स्वप्न होते. पण इथलं वातावरण पाहून मी तसं केलं नाही.

पण जेव्हा माझी आई आजारी होती आणि मरत होती, तेव्हा मला वाटले की तिला सेटवर आणून मी कुठे काम करते ते दाखवावे. पण तरीही हे शक्य होऊ शकले नाही."

इतर कलाकारांप्रमाणे मोनिकानेही निर्मात्यांवर वेळेवर पैसे न दिल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वी रोशन फेम अभिनेत्री जेनिफर बंसीवालाने सुद्धा सेटवर मिळणाऱ्या गैरवर्तवणुकीबद्दल मौन सोडलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com