Urfi Javed video: "उर्फी फक्त फायर ब्रिगेड जॉइन करायचीच राहिली", फॅशन पाहून नेटकरी कोमातच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed video

Urfi Javed video: "उर्फी फक्त फायर ब्रिगेड जॉइन करायचीच राहिली", फॅशन पाहून नेटकरी कोमातच...

" आग लगे चाहे बस्ती में लेकिन हम तो अपनी मस्ती में" असं काहीसं उर्फी जावेदच आहे. उर्फीची फॅशन कोणाला आवडो किंवा तिला कोणी ट्रोल करो तिला याचा काही फरक पडत नाही. उर्फी जावेद आता परत एकदा तिच्या हटक्या फॅशनमुळे ती चर्चेत आली आहे.

उर्फीचे कपडे पाहून अनेकजण हैराण तर होतात पण त्याचबरोबर तिच्या फॅशनला पाहुन थक्कही होतात. आताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर उर्फीनं यावेळी नक्की काय घातलं आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

खरं तर विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असलेल्या उर्फीने आजवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दगड, ग्लास, शंख, कचऱ्यांची पिशवी , अंतरंगी कोन अशी न संपणाऱ्या फॅशन लिस्टचा सामावेश आहे. मात्र आता उर्फीनं नेमकी काय फॅशन केली आहे? नक्की तो कोणता प्रॉप आहे? समजत नाही आहे.

या व्हिडीओमध्ये उर्फीने पांढऱ्या रंगाची बिकनी आणि पांढऱ्या रंगाच्या पाईप सारखे काहीतरी घेऊन अंगाभोवती वेटोळे केले आहे आणि लिहिले आहे "जेव्हा तुमच्या आजूबाजूला चिंगारी उडतात" आणि पोझ देत आहे आणि आता उर्फीने फॅशन केली तर चर्चा होणारच.

एका युजर्सने लिहिले " उर्फी हि कोणती चिंगारी आहे गं? " " उर्फी हा तर वॉशिंग मशीनचा पाईप वाटतो आहे". "आज उर्फी डायपर लावून आली की काय? अशा अनेक कमेंट तिच्या व्हिडिओला येत आहेत.

टॅग्स :viralVideoactress