Pudhcha Paaul: अक्कासाहेबांचा दरारा घेऊन पुन्हा येतेय ‘पुढचं पाऊल’ मालिका.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

most famous Pudhcha Paaul marathi serial telecast again on pravah picture channel

Pudhcha Paaul: अक्कासाहेबांचा दरारा घेऊन पुन्हा येतेय ‘पुढचं पाऊल’ मालिका..

Pudhcha Paaul marathi serial grand come back: महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली अगदी घराघरातच नाही तर प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचलेली स्टार प्रवाह वाहिनीवरील 'पुढचं पाऊल' ही मालिका लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे..

सर्वाधिक मनोरंजन करणारी आणि सर्वाधिक काळ चाललेली मालिका अशी या मालिकेची ओळख होती. या मालिकेने जवळपास दोन हजार भाग आणि सहा वर्षांचा टप्पा गाठला होता. 2011 ला सुरू झालेली ही मालिका 2017 मध्ये बंद झाली.

पण या मालिकेचा चाहता वर्ग इतका मोठा होता की ही मालिका जाऊ नये यासाठी प्रेक्षकांनी तगादा लावला होता. कारण ग्रामीण भागात या मालिकेची प्रचंड क्रेझ होती. अखेर पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लवकरच 'पुढचं पाऊल' प्रवाह पिक्चर वाहिनीवर पुर्नप्रक्षेपित करण्यात येणार आहे.

(most famous Pudhcha Paaul marathi serial telecast again on pravah picture channel)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल


या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांना आजही विसलेले नाहीत.अक्कासहेब त्यांचा दरारा तर अजूनही प्रेक्षकांना लक्क आठवतो. शिवाय त्यांच्या न्यायी बाणा, प्रेम हातातला चाबूक संगळच जाऊन आता बंद झालं असं डोळ्यांसमोर आहे.

शिवाय कल्याणी, आईसारखा जीव लावणारी देवकी काकू, आजोबा आणि खलनायिका रूपाली, तिची आई आणि कपटी मामा. या सगळ्याच पात्रांनी आपल्या भूमिका अक्षरशः जीवंत केल्या.

मालिकांची चाकोरी मोडून सासू-सुनेचं वेगळ्या प्रकारे उलगडलेलं नातं हे 'पुढचं पाऊल'चं वेगळेपण. या मालिकेतील आक्कासाहेब आपल्या सुनांच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभ्या राहिल्या. मग तो पुनर्विवाह असो, शिक्षण असो किंवा नवं तंत्रज्ञान आत्मसात करणं...

आक्कासाहेबांनी कायमच सुनांचं समर्थन केलं. वेळप्रसंगी त्यांनी विरोधही पत्करला. तसंच गावातल्या लोकांच्या भल्यासाठी त्या धावूनही गेल्या. काळाच्या पुढचा विचार या मालिकेतून मांडण्यात आला. म्हणूनच प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम केलं. 

आता पुन्हा ही मालिका प्रक्षेपित होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.