Most Popular Movie 2023 : पठाण, जवान, गदर 2 की अ‍ॅनिमल, यंदाच्या वर्षात कुणी मारली बाजी?

यंदाच्या वर्षी देखील भारतातून प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्या मोठी आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो आकडा ५०० पेक्षाही जास्त आहे.
Best Bollywood Movies 2023
Best Bollywood Movies 2023

Best Bollywood Movies 2023 : जगातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणून बॉलीवूडकडे पाहिले जाते. वर्षभरात सर्वाधिक चित्रपट निर्मिती ही बॉलीवूडमध्ये होते. ४०० हून अधिक वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होतात. त्यात एकटया बॉलीवूडमधून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या ही १५० हून अधिक आहे. यातील कित्येक चित्रपट हे आता ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यानं त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या वर्षी देखील भारतातून प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची संख्या मोठी आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो आकडा ५०० पेक्षाही जास्त आहे. त्यात विविध भाषांमधील चित्रपटांचाही समावेश आहे. मात्र सर्वाधिक चर्चा होते ती हिंदी आणि टॉलीवूडमधील चित्रपटांची. भौगोलिक क्षेत्राचा विचार केल्यास उत्तरेकडील भाग आणि तेथील हिंदी भाषिकांची संख्या महत्वाची ठरते. आपण यंदाच्या वर्षी बॉलीवूडच्या कोणत्या चित्रपटानं सर्वाधिक बाजी मारली हे जाणून घेणार आहोत.

१. जवान -

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या जवाननं बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम केल्याचे दिसून आले. त्यानं हजार कोटींची कमाई केली होती. वर्ल्ड वाईड या चित्रपटाचे कलेक्शन हे १३०० कोटींच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले होते. साऊथच्या अॅटलीनं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये शाहरुख सोबत नयनातारा, विजय सेतुपति, सुनील ग्रोव्हर, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या.

२. रॉकी और रानी की प्रेम कहानी -

करण जोहरनं दिग्दर्शित केलेल्या या विनोदीपटामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी प्रेक्षकांची, चाहत्यांची मोठी पसंती मिळवल्याचे दिसून आले. ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई करुन त्यानं वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटविल्याचे दिसून आले. त्यात शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन, यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या.

३. अॅनिमल -

संदीप रेड्डी वांगाच्या या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होती. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या अभिनयानं अॅनिमल प्रेक्षकांना कमालीचा भावला. यंदाच्या वर्षातील सर्वाधिक वादग्रस्त चित्रपट म्हणूनही त्याकडे पाहिले गेले. या चित्रपटातून रणबीर कपूरचा वेगळाच अंदाज दिसून आला. ज्याचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे. बॉबीनंही त्याच्या चाहत्यांना जिंकून घेतले.

Best Bollywood Movies 2023
Gadar 2 Review : तुम्ही दरवेळी पाकिस्तानात जायचं, तोडफोड करुन भारतात यायचं, प्रेक्षकांनी ते पाहायचं! म्हणजे आम्ही वेडे?

४. पठाण -

शाहरुखला नव्यानं ओळख ज्या चित्रपटानं मिळाली त्या पठाणनं यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून आपली मोहोर उमटवली. १२०० कोटींपेक्षा जास्त कमाई या चित्रपटानं एकट्या भारतातून केली होती. वर्ल्ड वाईड कमाईचा आकडा मोठा होता. दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, यांच्या महत्वाच्या भूमिका या चित्रपटामध्ये होता. शाहरुखचा वेगळाच स्वॅग या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

Best Bollywood Movies 2023
Pathaan Review : 'डोक्याची गोळी घेऊन जा! 'पठाण' पाहिल्यावर घ्यावीच लागेल'

५. गदर २ -

तब्बल २२ वर्षांच्या अंतरानं प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा गदर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून आले. सनी देओलचा हटके अंदाज गदर २ मध्ये दिसून आला. उत्कर्ष शर्मा या नवोदित अभिनेत्यानं त्याच्या अभिनयाची वेगळीच चुणूक दाखवून दिली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही वर्षात त्याचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

६. टायगर ३ -

खरं तर सलमानच्या टायगर ३ कडून चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. मात्र तो चित्रपट काही चाहत्यांच्या अपेक्षांना खरा उतरला नाही. त्यानं भलेही ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली असे म्हटले जाते पण स्टोरीलाईनच्या बाबत या चित्रपटानं चाहत्यांनी निराशा केली. यापूर्वी सलमानच्या किसी का भाई किसी की जान नावाच्या चित्रपटानं देखील प्रेक्षकांना नाराज केले होते.

७. सॅम बहादूर -

मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर चित्रपटानं रणबीरच्या अॅनिमलला फाईट देण्याचा प्रयत्न केला त्यात तो काही अंशी यशस्वीही झाल्याचे दिसून आले. भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात विकी कौशलनं माणेकशा यांची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेनं तो मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी, चाहत्यांचे कौतुकही केले होते.

८. डंकी - एकाच वर्षात शाहरुखचा तिसरा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचे दिसून आले. राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यालाही चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यानं केलेली कमाई तीनशे कोटींच्या घरात आहे. याचवेळी साऊथच्या प्रभासचा सालारही प्रदर्शित झाला असून त्यानं डंकीला तगडी फाईट दिली आहे.

Best Bollywood Movies 2023
12 th Fail Movie Review : रक्ताचं पाणी केल्याशिवाय यश मिळणार नाही! बारावी नापास झालेला 'तो' शेवटी IPS झाला की नाही?

९. १२ वी फेल -

प्रसिद्ध दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या १२ वी फेल नावाचा चित्रपट यंदाच्या वर्षातला सर्वाधिक चर्चेतील चित्रपट म्हणून सांगता येईल. त्यानं भलेही बाकीच्या चित्रपटांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली नसेल पण प्रेक्षकांच्या मनात घर करणारा चित्रपट म्हणून या १२ वी फेलचा उल्लेख करता येईल. त्यामध्ये विक्रांत मैस्सीनं प्रमुख भूमिका साकारली होती.

Best Bollywood Movies 2023
OMG 2 Review: कांतीलाल आला 'त्या' विषयावर डोस देऊन गेला! भगवान शंकरही शॉक

१०. ओएमजी २ -

अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असलेला ओएमजी २ हा देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेला चित्रपट म्हणता येईल. सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याच वेळी सनीचा गदर २ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानं ओएमजी २ ला मोठा संघर्ष करावा लागला होता.

या शिवाय मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे, सत्यप्रेम की कथा, जरा हटके जरा बचके, मिशन रानीगंज, ड्रीम गर्ल २, घुमर, सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यात सत्यप्रेम की कथा आणि ड्रीम गर्ल २ यांना बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी चांगली साथ दिल्याचे दिसून आले. सध्या हेच चित्रपट ओटीटीवर देखील नेटकऱ्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com