Pathaan Review : 'डोक्याची गोळी घेऊन जा! 'पठाण' पाहिल्यावर घ्यावीच लागेल'

पठाणच्या कथेमध्ये काहीही नवीन नाही. फरक एवढाच की यावेळचं पाकिस्तानचं मिशन बायो वॉरचे आहे.
Pathaan Review
Pathaan Review esakal

Pathaan Movie Review Shah Rukh Khan : काय तर म्हणे चार वर्षानंतर बॉलीवूडच्या किंग खानचा पठाण हा चाहत्यांच्या भेटीला येणार अशी चर्चा, भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद, शाहरुखच्या आतापर्यतच्या वक्तव्यावरुन वाद, आणि त्यानं पठाणचे चालवलेले प्रमोशन हे किती आशेनं केले होते हे पठाण पाहिल्यावर कळून येते.

तेच ते तेच....असं पठाणबाबत म्हणावे लागेल. त्याच त्या स्पाय स्टोरीज. पाकिस्तानला शिव्या घालणं, जुना इतिहास उकरुन काढून त्यामध्ये भारतीय गुप्तहेरांच्या कथा रंगवून सांगणं हा फॉर्म्युला आता काही नवीन राहिलेला नाही. त्यामध्ये आतापर्यत सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी भरपूर कमाई करुन घेतली आहे. आता शाहरुखचा आलेला पठाणही त्याला अपवाद नाही.

पठाणच्या कथेमध्ये काहीही नवीन नाही. फरक एवढाच की यावेळचं पाकिस्तानचं मिशन बायो वॉरचे आहे. बाकी सगळं काही सारखचं. त्याचं होतं असं की, काश्मीरमधून ३७० कलम हटवलं त्याचा पाकिस्तानला खूप राग आला आणि त्यांनी जिमला (जॉन अब्राहम) हाताशी धरुन भारताचा काटा काढण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये रुबाया (दीपिका पदुकोण) सहभागी आहे. यासगळ्यात पठाण हे मिशन थांबवतो की त्याला अपयश येते हे चाहत्यांनी प्रत्यक्ष पडद्यावर पाहावे.

पठाणच्याबाबत सांगायचे झाल्यास त्यामध्ये तो हिट करण्यासाठी एवढा मसाला वापरण्यात आला आहे की, त्याचा परिणाम म्हणजे तो कमालीचा रटाळ झाला आहे. काहीच्या काही....म्हणजे शाहरुख मोठ्या गोडाऊनमध्ये हॅलीकॉप्टर चालवणं, जॉननं बर्फावरुन गाडी चालवणं, दीपिकाचे अवाक् करणारे ते अचाट प्रयोग हास्यापद झाले आहे. त्यामुळे आपण पठाण पाहतो आहोत की कार्टून मुव्ही हे कळत नाही.

Pathaan Review
Jaya Jaya Jaya Jaya Hey Review : बायको जयासारखी असेल तर मग 'दवाखाना' जवळ हवाच!

पठाणच्या प्रदर्शनापूर्वीच तो कमालीच्या वादात सापडला होता. त्याचे एक मुख्य कारण म्हणजे त्या चित्रपटामध्ये दीपिकानं परिधान केलेली भगव्या रंगाची बिकीनी, दीपिका ही पाकिस्तानच्या आय़एसआयची एजंट आहे. पाकिस्तानी महिला एजंटला भारतीय गुप्तहेराशी प्रेम होणं ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. सलमानच्या चित्रपटामध्ये आपण ते पाहिलं आहे. याही चित्रपटामध्ये ते दिसून येतं. फक्त दीपिकाचा बेशरम रंग नावाचं गाणं तेवढं प्रेक्षकांना आकर्षित करतं.

Pathaan Review
Trial By Fire Web Serise Review : काळजावर हात ठेवून पाहावी लागेल 'ट्रायल बाय फायर'!

पठाणचा वनवास आता संपला आहे. त्याला बोलविण्याची वेळ आली आहे. असे डिंपल कपाडिया जेव्हा म्हणते तेव्हा पठाण ज्या उडया मारायला लागतो ते पाहून हा एवढा शक्तिमान कसा काय झाला, त्याला काहीच कसे होत नाही, त्याला सगळ्याच गोष्टी कशा काय येतात. तो अवघ्या काही सेकंदात सगळीकडे कसा काय पोहचतो असे प्रश्न आपल्याला पडले तरी त्याला काही अर्थ नाही. कारण तुम्ही शाहरुखचा पठाण पाहता आहात हे गृहित धरावे लागते.

जॉन अब्राहम हा नेहमीप्रमाणे अतिमानवी शक्तींनी वेढलेला दिसतो आहे. त्याला काही करुन त्याच्या पत्नीच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळे तो पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला जाऊन मिळतो आणि तो त्यांचा होतो....हे सगळं सांगण्यामागे कारण म्हणजे चित्रपट आणखी उत्कंठावर्धक व्हावा म्हणून कथाकार सिद्धार्थ आनंद यांनी केलेली मांडणी ही फारशी प्रभावी नाही. हे आवर्जुन सांगावे लागेल.

Pathaan Review
Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

काही वर्षांपूर्वी साऊथचे सुपरस्टार रजनीकांतचा रोबोट नावाचा चित्रपट आला होता. त्यामध्ये त्यानं जे काही केलं होतं त्याचे मीम्स आजही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. मात्र ती गोष्ट जेव्हा शाहरुख करायला गेला तेव्हा ते कमालीचं हास्यापद झालं आहे. अभिनयाच्याबाबत शाहरुख, जॉन आणि दीपिका यांची कामगिरी चांगली आहे. बाकी सगळं ओक्के असे म्हणावे लागेल.

Pathaan Review
Pathaan: शाहरुख - सलमान पठाण मध्ये एकत्र, व्हिडिओ व्हायरल

ट्रेलरमध्ये पठाणच्या तोंडून जो संवाद आपण जो मेहमान नवाजीचा संवाद ऐकतो तेवढा वगळल्यास फार काही प्रभावी संवाद या चित्रपटामध्ये नाही. उगाचच प्रेक्षकांकडून टाळ्यांची दाद मिळवण्यासाठी विनोदी वाक्यांची पेरणी या चित्रपटांमध्ये आहे. ज्यांनी हॉलीवूडचे अॅक्शनपट पाहिले आहे त्यांना पठाण निव्वळ कॉमेडी वाटण्याची शक्यता आहे. तर शाहरुखच्या चाहत्यांची आपल्या लाडक्या किंग खानचं किती कौतूक करावं अशी भावना तयार होणं साहजिकच आहे.

Pathaan Review
Shah Rukh Khan Pathaan: आणि शाहरुख पर्व सुरू.. पठाण च्या पहिल्याच शो ला तुफान गर्दी

गाणी, संगीत हे बाकी उत्तम आहे. कोरियाग्राफी ठीक आहे. चार वर्षानंतर बॉलीवूडच्या किंग खानचा पठाण आला मात्र तो पाहिल्यानंतर त्यानं आणखी वेळ घेतला असता तर चांगला चित्रपट पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता आला असता. चाहत्यांची गोष्ट वेगळी त्यांना किंग खाननं कितीही पंख लावून हवेत गिरक्या घेतल्या तरी त्या भारीच वाटणार. पठाणमध्ये तो आणि जॉन यांनी जे अॅक्शन स्टंट केले आहेत ते पाहून हॉलीवूडचे अॅक्शन चित्रपटाचे दिग्दर्शक डोक्याला हात लावून बसले असतील.

शाहरुख आणि सलमानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट पठाण मध्ये आहे. करण अर्जुन या चित्रपटामध्ये एकत्र दिसले आहेत. त्याचे कनेक्शन त्यांनी कशाशी जोडले आहे याचे लॉजिक तुम्हाला पठाण पाहून कळलं तर तुमचं डोकं ठणकल्याशिवाय राहणार नाही.

चित्रपटाचे नाव - पठाण

कलाकार - शाहरुख खान, दीपिका पदुकोण, ज़ॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, सलमान खान

दिग्दर्शक - सिद्धार्थ आनंद

स्टार - ** ( दोन स्टार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com