सुशांतसिंह मृत्यू प्रकरणावर चित्रपट; शक्ती कपूर सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत

सकाळ ऑनलाईन
Saturday, 19 September 2020

चित्रपटाच्या माध्यमातून सुशांतच्या व्यक्तिमत्वाच्या  पैलुंचा शोध घेतला जाणार आहे. दिलीप गुलाटी हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असुन रिया चक्रवतीची भुमिका श्रेया शुक्ला साकारणार असल्याचे समजते.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावर आधारित चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुशांतसिंहच्या भुमिकेत जुबेर खान दिसणार आहे. सरला सारागोई आणि राहुल शर्मा या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपुर्वी सुशांतसिंहने आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे बॉलिवूड हादरुन गेले. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली यासंदर्भातील चर्चेलाही उधाण आल्याचे पाहायला मिळाले.   

अनुराग कश्यप म्हणाले 'जा चीनवर हल्ला कर', कंगना म्हणाली 'अरे मंदबुद्धी...'

विशेष म्हणजे देशातील सीबीआई, एनसीबी आणि ईडी या तीन मोठ्या तपासयंत्रणा घटनेचा तपास करत आहेत. सध्या तपासावरुन राजकिय,सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण ढवळुन निघाले आहे. संपुर्ण देशाचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. सुशांतचे जाणे त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक गोष्ट होती. चित्रपटाच्या माध्यमातून सुशांतच्या व्यक्तिमत्वाच्या  पैलुंचा शोध घेतला जाणार आहे. दिलीप गुलाटी हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असुन रिया चक्रवतीची भुमिका श्रेया शुक्ला साकारणार असल्याचे समजते.  श्रेयाने यापुर्वी वेब सिरीजसधुन काम केले आहे. सुशांतसिंहच्या प्रमुख भुमिकेत जुबेर खान दिसणार आहे. दिशा सालियानच्या भुमिकेसाठी बिग बाँस फेम सोमी खान हिची निवड करण्यात आली आहे. या पात्राची निवड केल्यानंतर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात दिशा सालियनचाही सहभाग आहे की काय असा विचार करण्यास दर्शकांना भाग पाडले आहे. 

हे ही वाचा: सुशांत सिंह राजपूतची शेवटची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल, दिशा सालियनशी संबंधित होती स्टोरी  

याबरोबरच ज्येष्ठ अभिनेते शक्ति कपुर हे सीबीआय अधिकाऱ्याच्या भुमिकेत काम करताना दिसणार असून  अरुण बक्शी हे सुशांतच्या वडिलांची भुमिका साकारणार आहेत.  ईडी अधिका-याच्या भुमिकेत अमन वर्मा आहेत. अभिनेता असरानी आणि प्रसिध्द नर्तिका सुधा चंद्रन महत्वाच्या भुमिकेत आहेत. आता प्रत्यक्षात हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: movie based on sushant singh rajput death case know About cast