Movie drishyam 2 : ब्रह्मास्रपाठोपाठ उंचाई आणि दृश्यम २ ने हिंदी चित्रपटसृष्टीला सावरले

गेले काही महिने हिंदी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली होती. आरआरआर, केजीएफ-२ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कांतारा या चित्रपटांना रसिकांनी चांगली पसंती दिली होती.
drishyam 2
drishyam 2sakal
Summary

गेले काही महिने हिंदी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली होती. आरआरआर, केजीएफ-२ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कांतारा या चित्रपटांना रसिकांनी चांगली पसंती दिली होती.

मुंबई - गेले काही महिने हिंदी चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविली होती. आरआरआर, केजीएफ-२ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कांतारा या चित्रपटांना रसिकांनी चांगली पसंती दिली होती. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत काहीशी निराशा पसरलेली होती. परंतु आता ब्रह्मास्र या चित्रपटापाठोपाठ उंचाई आणि दृश्यम २ या चित्रपटांना रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दृश्यम २ या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत चैतन्याचे वातावरण पसरलेले आहे.

बाहुबली फेम एस. एस. राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बाराशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यानंतर आलेल्या दिग्दर्शक प्रशांत नीलच्या केजीएफ चॅप्टर २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटानेही बाराशे कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केला होता. त्यानंतरच्या कार्तिकेय २ या चित्रपटालाही प्रेक्षकांनी उत्तम पसंती दिली होती. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या अभिनेता व दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या कांतारा या चित्रपटानेही आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. आताही हा चित्रपट विविध चित्रपटगृहात सुरू आहे. या दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसची सगळी गणितेच बदलल्यामुळे आणि त्यातच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांना फारसे प्रेक्षकच येत नसल्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत काहीसे चिंतेचे वातावरण पसरलेले होते.

प्रेक्षक दाक्षिणात्य चित्रपटांना अधिक पसंती देत असल्यामुळे हिंदीतील निर्मात्या व दिग्दर्शकांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. एकीकडे साऊथचे चित्रपट आणि दुसरीकडे ओटीटीसारख्या नव्या प्लॅटफार्मची तीव्र स्पर्धा पाहता चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रेक्ष्षक हिंदी चित्रपट पाहायला येतील की नाही अशी शंका त्यांच्या मनात होती. मात्र्र दिग्दर्शक अभिषेक पाठकच्या दृश्यम २ या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांहून अधिक कमाई केल्यामुळे आता भीतीचे सावट दूर झाले आहे. दृश्यमने आतापर्यंत १०४.६६ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट आताही चित्रपटगृहात सुरू असल्यामुळे तो आणखीन कमाई करील असे बोलले जात आहे.

याबाबत अभिनेत्री काजोल म्हणाली, की दृश्यम २ हा चित्रपट यशस्वी झाला त्याबद्दल अजयचे अभिनंदन आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. सगळ्यांनी उत्तम काम केले आहे आणि त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे. प्रेक्षकांचे खूप खूप आभार..कौटुंबिक चित्रपटांना प्रेक्षक पसंती देत आहेत. आता माझा सलाम वेंकी हा चित्रपट येत आहे. एका आईची आणि मुलाची ही भावनिक कहाणी आहे.

निर्माता आणि अभिनेता तुषार कपूर म्हणाला, की कोरोनानंतर काहीसे संभ्रमाचे वातावरण तयार झालेले होते. परंतु आता प्रेक्षक चित्रपटगृहात चित्रपट पाहायला येत आहेत. ही आनंदाची बातमी आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श म्हणाले, की दृश्यमला चांगले यश मिळालेले आहे ही गोष्ट खरी असली तरी आगामी येणारे चित्रपट किती व्यवसाय करतात याकडेही आता लक्ष्ष देणे आवश्यक आहे. रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट येत आहे आणि तो मोठा चित्रपट आहे. तो चांगली कमाई करील असे वाटते. कारण आता हिंदी चित्रपटांना प्रेक्ष्षक येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com