Movie Review; जीव गमावलेली कथा 'हम दो हमारे दो', निव्वळ पांचट... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Movie Review; जीव गमावलेली कथा 'हम दो हमारे दो', निव्वळ पांचट...
Movie Review; जीव गमावलेली कथा 'हम दो हमारे दो', निव्वळ पांचट...

Movie Review; जीव गमावलेली कथा 'हम दो हमारे दो', निव्वळ पांचट...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

ट्रेलर आणि टीझर पाहून बऱ्याचदा चित्रपट कसा आहे याचा अंदाज येतो. अनेकदा तो फसतोही. तसं ते हम दो हमारे दो या चित्रपटाच्या बाबत झालं असं सांगता येईल. काहीही नवीन या चित्रपटामध्ये नाही. मुळात कथाच एवढी साधी आणि जीव गेलेली आहे की, त्या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही. काय तर म्हणे अनाथ मुलाला लग्न करताना लग्नाल येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे तो ज्याप्रकारच्या युक्त्या करतो त्या पाहायच्या असतील हा पाचंटपट पाहावा. दोन तासांच्या या बोरपटात फारसं हाती काही लागत नाही. राजकुमार राव म्हणून अनेकांनी हा चित्रपट पाहिला मात्र कथेतच काही दम नसल्यानं नुसत्या राजकुमारच्या अभिनयावर हम दो हमारे दो कितपत टिकाव धरणार ही शंकाच होती. आणि ती आता खरी ठरली आहे.

राजकुमार राव सह ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, रत्ना पाठक शहा, क्रिती सेनन यांच्याही भूमिका या चित्रपटामध्ये आहे. पण एवढे दिग्गज कलाकार असूनही आपण काय पाहतो आहोत, त्यात काही तार्किकता आहे का, असे प्रश्न हा चित्रपट पाहून आपल्याला पडल्यावाचून राहणार नाही. ध्रुवला (राजकुमार राव) दत्तक घेतलं जातं. तो अनाथ आहे. त्याचं लग्न सुंदरशा अन्या (क्रिती सेनन) सोबत ठरतं. वास्तविक अन्याचे आई वडिल तिच्या लहानपणी वारले आहेत. मात्र तिचा सांभाळ तिच्या काका काकूंनी मोठ्या प्रेमानं केला आहे. एका प्रसंगात अन्या आणि ध्रुवची ओळख होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. एका गाण्यात आणि चार दोन वेगळ्या दृश्यांतून त्यांचं प्रेम फुलूनही येतं. आणि आता ते लग्नाचा विचार करतात. पण....

त्या लग्नासाठी अन्याची एक अट असते. तिला आई वडिल असणाऱ्या मुलाशी लग्न करायचे असते. एका कंपनीत ब्लॉगर म्हणून काम करणारी अन्या क्षणात टिपिकल होते तो प्रसंग आपल्याला धक्का देणारा आहे. हे सगळं का, कसं, होत याची उत्तरे प्रेक्षकांनी शोधायची. दिग्दर्शकानं त्या दोन्ही पात्रांची पार्श्वभूमी फारशा विस्तारानं काही मांडलेली नाही. त्या पात्रांचे विचार बदलण्यामागे काय परिस्थिती आहे याचाही शोध घेण्याचा अपूर्ण असल्याचे हम दो हमारे दो मधून दिसून आले आहे. बरं हे सगळं सांगण्यासाठी कॉमेडी जॉनरचा आधार दिग्दर्शक अभिषेक जैन यांनी घेतला आहे. यासगळ्यात अपारशक्ति खुराणा याचा अभिनय आणि त्याचे कॉमेडी टायमिंग लक्षात राहणारे आहे. राजकुमार रावपेक्षा त्याच्या अभिनयानं मनोरंजन झाले असे म्हणता येईल.

काही महिन्यांपूर्वी बॉलीवूडमध्ये याच धर्तीवर एक चित्रपट आला होता त्यामध्ये यामिनी गौतम आणि विक्रांत मेस्सी यांनी काम केलं होतं. हम दो हमारे दो पाहताना त्या चित्रपटाची आठवण येऊ लागते. कोरोनामुळे मनोरंजन विश्वाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. कदाचित त्यादरम्यान चित्रित झालेल्या या चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शक यांना बराच काळ वाट पाहावी लागली. त्याचा फटकाही त्यांना बसल्याचे यावेळी जाणवते. कारण अनेक निर्माते आणि दिग्दर्शक यांनी आपल्या अर्धवट कलाकृती कोरोनाच्या धास्तीनं पूर्ण करत त्या प्रदर्शित केल्या आहेत. आर्थिक गणिताचा विचार करुन त्यांनी अशाप्रकारचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. म्हणून त्याचा परिणाम संबंधित चित्रपटाच्या सादरीकरणावरही झाला की काय असा प्रश्न आपल्याला पडतो.

ध्रुव अन्याशी लग्न करण्यासाठी खोटे आई वडिल तयार करतो. आणि ते अन्याच्या काकांसमोर उभे करतो. त्याचे काका जे डॉक्टर आहेत त्यांना आपली फसवणूक होते आहे हे काही केल्या कळत नाही. ऐन लग्नाच्या वेळेस जे घडतं त्यातून चित्रपट आपल्या डोक्याबाहेर जातो....ते जाणून घ्यायचं असल्यास हम दो हमारे दो च्या वाट्याला जावं. बाकी त्याच्याविषयी फार काही सांगण्यासारखे नाही. एखाद दोन प्रभावी संवाद आहेत. गाणी एकदा ऐकल्यावर पुन्हा आठवतही नाही. अशी आहेत....बाकी सगळा गोंधळ आहे.

स्टार - **

कलाकार - राजकुमार राव, परेश रावल, क्रिती सेनन, रत्ना पाठक शहा

दिग्दर्शक - अभिषेक जैन

हेही वाचा: Movie Review; 'नुसतचं भांडण नको, संवादही हवा'; Meenakshi Sundareshwar

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

loading image
go to top