Movie Review; 'ये दिल मांगे मोअर', शेरशाह नादखुळा !

बॉलीवूडचं वेगळेपणं अनेकदा दिसून येतं. तसेच सारखेपणाही चटकन लक्षात येतो...
Movie Review; 'ये दिल मांगे मोअर', शेरशाह नादखुळा !

बॉलीवूडचं वेगळेपणं अनेकदा दिसून येतं. तसेच सारखेपणाही चटकन लक्षात येतो. एखादया औचित्यानं सारख्या विषयांवर चित्रपट प्रदर्शित होणं ही गोष्ट बॉलीवूडला नवीन नाही. यापूर्वी भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित तीन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यापैकी दिग्दर्शक राजकुमार संतोषी दिग्दर्शित द लिजंड ऑफ भगतसिंग हा चित्रपट प्रेक्षकांना भावला होता. त्यात अजय देवगणनं भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. तर ए आर रहमाननं त्या चित्रपटाला संगीत दिलं होतं. त्यातील अजयचा अभिनय आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं दोन देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. एक अजय देवगणचा भुज द प्राईड ऑफ इंडिया आणि सिद्धार्थ मल्होत्राचा शेरशाह.

या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. त्याच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यात विशेष उल्लेख करायचा झाल्यास अजयच्या भुजकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नसल्याचे दिसुन आले. रिलिज झाला म्हणून पाहणं हा उद्देश ठेवून अनेकांनी हा चित्रपट पाहिला. सोशल मीडियावर भुज आणि त्याच्या कलाकारांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भुजच्या तुलनेत शेरशाहनं बाजी मारली आहे. भलेही भुजमध्ये तगडी स्टार कास्ट असेल पण शेरशाह भाव खावून गेला आहे.

सिद्धार्थ मल्होत्राची शेरशाहमध्ये प्रमुख भूमिका आहे. त्यानं कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका केली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटामध्ये सिद्धार्थनं त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे. त्यानं यापूर्वी केलेल्या भूमिकांपेक्षा एक वेगळी आणि प्रभावी भूमिका आपल्याला त्याच्या शेरशाहमध्ये पाहायला मिळते. एक अल्लड, खोडकर तरुण ते देशप्रेमानं प्रेरित होऊन देशासाठी आपल्या प्राणांची आहूती देणारा कॅप्टन विक्रम बत्रा त्यानं मोठ्या ताकदीनं साकारला आहे. दिग्दर्शक विष्णू वर्धननं कारगील, हिमालय, लेह, लडाख, चंदीगढ मध्ये चित्रित केलेले प्रसंग लक्षवेधी आहे. त्याच्या दिग्दर्शनाचं कौतूक करायला हवं.

पालनपूर मधील एक तरुण. त्याचं नाव विक्रम बत्रा. त्याला सैन्यात जायचं आहे. घरातून यापूर्वी कुणी सैन्यात गेलेलं नाही, पण त्याला जायचंय. वडिल शिक्षक आहेत. आपल्या मुलाचं स्वप्न हे त्यांना ठाऊक आहे. ते त्याच्या आड येत नाही. विक्रम हा पहिल्यापासून मनमिळावू स्वभावाचा, बोलका, उत्साही, चेहऱ्यावर कायम हसू असणारा. त्याची ही स्वभाव वैशिष्ट्यं त्याला मोठ्या उंचीवर नेतात. कॉलेजला असताना त्याच्या आयुष्यात डिंपल (किएरा अडवाणी) येते. काहीही झालं तरी आपल्याला तिच्याशीच लग्न करायचं अशी इच्छा विक्रमची असते. ती पूर्ण होते का, यासाठी आपल्याला शेरशाह पाहावा लागेल.

आपल्याला नेव्ही मध्ये जायचं आहे, कारण तिथं पगार चांगला मिळतो, असं विक्रम पहिल्यांदा डिंपलला सांगतो. मात्र त्यानंतर त्याचा निर्णय बदलतो आणि तो आर्मीमध्ये जॉईन होतो. येथूनच विक्रमच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळते. सैन्यात गेल्यापासून विक्रम बदलतो. त्याचं व्यक्तिमत्व, त्याचे विचार, त्याची आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी हे सारं बदलतं. हा बदल दिग्दर्शक विष्णू वर्धननं मोठ्या खुबीनं पडद्यावर साकारला आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुंदर आहे. किएरा आणि सिद्धार्थ यांच्यातील केमिस्ट्रीही चांगली जमून आली आहे.

Movie Review; 'ये दिल मांगे मोअर', शेरशाह नादखुळा !
नवरा तुरुंगातून बाहेर कधी येणार? स्वातंत्र्यदिनी शिल्पा ट्रोल

विक्रम बत्रा जेव्हा त्याच्या वेगवेगळ्या मोहिमांवर जातो तेव्हा त्याचं धाडस, त्यानं केलेली कामगिरी, त्याचं नेतृत्व या गोष्टींनाही दिग्दर्शकानं हायलाईट केलं आहे. सिनेमा केवळ विक्रम बत्राच्या भोवती न फिरता काश्मीर, काश्मीरमधील वातावरण, तेथील नागरिक, त्यांचे प्रश्न, दहशतवादी, त्यांच्या जीवघेण्या कारवाया, याशिवाय सैन्य प्रशासन यावरही वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य करतो. ते जाणून घेण्यासाठी शेरशाह पाहणं एक वेगळा आनंददायी अनुभव ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com