सलमान-दीपिका एकत्र?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

चित्रटाची स्क्रीप्ट पूर्ण व्हायला भन्साळींना सात-आठ महिन्यांचा कालावधी लागेल व पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटींग चालू होईल अशी चर्चा आहे. मागच्याच महिन्यात या चित्रपटाचे टायटल रजिस्टर करण्यात आले आहे. दीपिका-रणबीरच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली, आता सलमान-दिपिकाची जोडी प्रेक्षकांना किती आवडते हे बघण्यासारखे असेल. 

रणवीर सिंग-दीपिका पदुकोण या जोडीला हमखास घेऊन चित्रपट करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे आता रणवीर-दीपिका नाही तर सलमान-दीपिका या जोडीला घेऊन चित्रपट काढणार आहेत. भन्साळी यांना सलमान खानसोबत चित्रपट काढायची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. त्यामुळे आता 'इंशाअल्लाह' या चित्रपटात आपल्याला सलमान-दीपिका ही जोडी दिसेल अशी चर्चा आहे.  

चित्रटाची स्क्रीप्ट पूर्ण व्हायला भन्साळींना सात-आठ महिन्यांचा कालावधी लागेल व पुढील वर्षी या चित्रपटाचे शूटींग चालू होईल अशी चर्चा आहे. मागच्याच महिन्यात या चित्रपटाचे टायटल रजिस्टर करण्यात आले आहे. दीपिका-रणबीरच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली, आता सलमान-दिपिकाची जोडी प्रेक्षकांना किती आवडते हे बघण्यासारखे असेल. 

सलमान सध्या त्याच्या 'भारत' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. भारत झाला की, इंशाअल्लाहचे काम सुरू होईल.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: movie with salman and dipika by sanjay leela bhansali