esakal | किरण खेर यांना ब्लड कॅन्सर, भाजप सहकाऱ्याची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

kirron kher

गेल्या चार महिन्यांपासून कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू

किरण खेर यांना ब्लड कॅन्सर, भाजप सहकाऱ्याची माहिती

sakal_logo
By
स्वाती वेमूल

भारतीय जनचा पार्टीच्या चंदीगडच्या खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. मुंबईतच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती भाजपाच्या सहकाऱ्याने दिली. किरण यांना मल्टिपल मायलोमा प्रकारचा ब्लड कॅन्सर झाला आहे. ६८ वर्षांच्या किरण खेर यांच्यावर गेल्या वर्षीपासून उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचं चंदीगडचे भाजप अध्यक्ष अरुण सूद यांनी सांगितलं. बुधवारी आयोजित केलेल्या खास पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

"गेल्या वर्षी ११ नोव्हेंबर रोजी चंदीगड इथल्या राहत्या घरी त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडमधल्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स (PGIMER) याठिकाणी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या असता त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचं निदान झालं. हा ब्लड कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पसरला आहे. त्यामुळे उपचारासाठी ४ डिसेंबर रोजी त्यांना मुंबईला जावं लागलं", असं सूद म्हणाले. 

हेही वाचा : रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची घोषणा

"नुकत्याच केलेल्या वैद्यकीय चाचण्यांनुसार हा कॅन्सर त्यांचा हात आणि खांद्यावरून कमी झाल्याचं समजतंय. गेल्या चार महिन्यांत त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला असून आता त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाहीये. फक्त वैद्यकिय चाचण्या आणि काही उपचारांसाठी त्यांना नियमितपणे रुग्णालयात जावं लागेल," असंही त्यांनी सांगितलं. 

किरण खेर या २०१४ मध्ये पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आल्या होत्या. काँग्रेसचे पवन बंसल आणि आम आदमी पार्टीच्या गुल पनाग यांचा त्यांनी पराभव केला होता. २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा बंसल यांच्यावर मात करत खासदारकी मिळवली. 
 

loading image