खूप दिवसांनी समोर आले Mrunal Dusanis चे फोटो, लूक इतका बदललाय कि ओळखू शकणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mrunal dusanis, mrunal dusanis family

खूप दिवसांनी समोर आले Mrunal Dusanis चे फोटो, लूक इतका बदललाय कि ओळखू शकणार नाही

Mrunal Dusanis News: अभिनेत्री मृणाल दुसानिसने सध्या मनोरंजन विश्वातून ब्रेक झालीय. मृणाल तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेत राहते. मृणाल सोशल मीडियावर त्याच्या फॅमिलीसोबतचे अनेक फोटो शेयर करत असते.

नुकतंच मृणालने एक फोटो शेयर केलाय ज्यात ती, तिचा नवरा आणि मुलगी दिसतेय. हे तिघेही खास ट्रिपला गेले असून मृणालने ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेयर केलेत.

( Mrunal dusanis special trip in hawaii with husband and daughter)

लग्नानंतर मृणाल बदलली असून खूप दिवसांनी तिचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो समोर आलेत. यात मृणालची हेयरस्टाईल बदलली असून तिची लेक सुद्धा आता मोठी झालीय.

नवरा नीरज आणि मुलगी नुरवी सोबत मृणाल हवाईला ट्रिपला गेलीय. मृणाल आणि तिचं कुटुंब वेळात वेळ काढत अमेरिकेतील हवाईला पिकनिकला गेलीय.

मृणाल आणि नीरजने काल पांढऱ्या रंगाचा खास वॅकेशन मोड कपडे परिधान केले आहेत. मृणाल आणि तिची मुलगीही फोटोत दिसत असून मृणालची मुलगी नुरवी आता मोठी झालीय.

मृणाल दुसानीस आता जरी काम करत नसली तरी तिचं फॅन फॉलोईंग काही कमी झालं नाही.मृणालने छोट्या पडद्यावर तू तिथ मी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे, माझिया प्रियाला प्रीत कळेना, अस्स सासर सुरेख बाई अशा लोकप्रिय मालिका केल्या.

मृणालने २०१६ ला नीरज मोरे सोबत लग्न केलं. नीरज हा पेशाने सॉफ्टवेयर इंजिनियर आहे. लग्नानंतर मृणाल अमेरिकेला गेली. लग्नानंतर काही वर्षांनी तिला मुलगी झाली. मृणालने मुलीचं नाव ठेवलं नुरवी.

मृणालने लेकीच्या जन्मानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केलेला. या व्हिडिओत मृणालचा पती लेकीला खेळवताना दिसतोय.

मृणालनं पोस्ट शेअर करताना एक खास कॅप्शनही लिहिलं होतं. 'आणि शेवटी नीरज बोलता झाला...नाहीतर घरात मी नाही बोलले तर कुणीच बोलत नाही.. भयंकर शांतता...पण आता सगळं बदलतं.' अशी खास पोस्ट मृणालने लिहिली आहे.

मृणालने गेली अनेक वर्ष मराठी मालिकेतून ब्रेक घेतला असून ती पुन्हा कमबॅक कधी करणार याची तिच्या फॅन्सना उत्सुकता आहे. मृणालने शेवटी कलर्स मराठीवरील सुखांच्या सरींनी हे मन बावरे मालिकेत अभिनय केलेला.

या मालिकेत मृणालची जोडी झळकली अभिनेता शशांक केतकर सोबत. शशांक आणि मृणालच्या जोडीला फॅन्सनी डोक्यावर घेतलं. आता मृणाल कमबॅक कधी करणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

टॅग्स :Marathi Movies