शाहीद व मृणालचा 'जर्सी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला...

वृत्तसंस्था
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मृणाल ठाकूर शाहीद कपूरसोबत जर्सी या चित्रपटात दिसणार आहे. कबीर सिंह या चित्रपटाच्या य़शानंतर शाहीद या चित्रपटात दिसणार आहे. जर्सी या चित्रपटात मृणाल लीड रोलमध्ये दिसणार आहे.

कानपूर : पदापर्णातच बॉलिवूडमध्ये दोन सलग हिट चित्रपट देणारी अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर. मृणालने खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसविले आहे. तिचा जर्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटात ती शाहीद कपूरसोबत दिसणार आहे. कबीर सिंह या चित्रपटाच्या य़शानंतर शाहीद या चित्रपटात दिसणार आहे. जर्सी या चित्रपटात मृणाल लीड रोलमध्ये दिसणार आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श याने व्टीट करत याबाबत माहिती दिली आहे. मृणालने आपल्या बॉलिवूडमधील करिअरची सुरवात सुपरस्टार ऋतिक रोशन सोबत 'सुपर 30' या चित्रपटाव्दारे केली होती. त्यानंतर ती 'बाटला हाऊस'मध्ये जॉन अब्राहमसोबत दिसली होती. 

'जर्सी' चे डायरेक्टर गौतम यांनी सांगितले की, या चित्रपटात अभिनेत्री म्हणून कोणाला घ्यायचे असा विचार सुरु असतानाच मला मृणाल या रोलसाठी फिट वाटली. त्यांच्या मते मृणाल या रोलला चांगला न्याय देईल. मृणाल देखील या चित्रपटाला घेऊन खुश आहे.

'जर्सी' हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे.  गौतम हे चित्रपटाचे  डायरेक्टर आहेत. त्यांनीच ओरीजनल व्हर्जनचे   दिग्दर्शन केले आहे. शाहीद कपूर या चित्रपटाच्या तयारीसाठी क्रिकेटचे धडे घेत आहे. चित्रपट पुढील वर्षी  28 आॅगस्टला चित्रपट रिलीज होणार आहे.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunal thakur will work with shahid kapoor in jersey