रमाबाईंच्या भूमिकेत मृण्मयी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत लवकरच छोट्या रमाची एंट्री होणार आहे. मृण्मयी सुपाळ बालपणीच्या रमाची भूमिका साकारणार आहे.

"स्टार प्रवाह' वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. यातील रामजी बाबा असोत, भिवा असो मीरा आत्या, तुळसा वा जिजाबाई प्रत्येकानेच आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतलं हे कुटुंब प्रत्येकालाच आपलंस वाटतंय. या कुटुंबात लवकरच नव्या सदस्याची भर पडणार आहे. या मालिकेत लवकरच छोट्या रमाची एंट्री होणार आहे. मृण्मयी सुपाळ बालपणीच्या रमाची भूमिका साकारणार आहे.

मृण्मयीला याआधी बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये आपण पाहिलं आहे. आता रमाबाई आंबेडकर यांची भूमिका साकारणं तिच्यासाठी नवं आव्हानच आहे. बऱ्याच ऑडिशन्सनंतर मृण्मयीची निवड करण्यात आली. आता रमाबाईंचं बालपण साकारण्याची संधी मृण्मयीला मिळाली आहे. मृण्मयी या भूमिकेसाठी सध्या खूप मेहनत घेत आहे. या मालिकेतली बोलीभाषा आणि तेव्हाचा काळ उभा करण्यात मृण्मयीला मालिकेची संपूर्ण टीम मदत करत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrunmayee Supal New Role In Serialडॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. यातील रामजी बाबा असोत, भिवा असो मीरा आत्या, तुळसा वा जिजाबाई प्रत्येकानेच आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतलं हे कुटुंब प्रत्येकालाच आ

टॅग्स