LGM Trailer Out: एमएस धोनीच्या 'लेट्स गेट मॅरिड'चा ट्रेलर व्हायरल! माहीची जोरदार बॅटिंग

धोनीच्या आता लेट्स गेट मॅरिड नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची आता मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.
Dhoni sakshi production film
Dhoni sakshi production film esakal

Dhoni sakshi production film lets get married movie trailer : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम एस धोनीचा चाहतावर्ग मोठा आहे. धोनीनं भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल पण त्यानं क्रिकेटला रामराम केलेला नाही. तो आयपीएलमधूनही चाहत्यांचे मनोरंजन करतो आहे. यासगळ्यात धोनीनं चित्रपट विश्वात नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला आहे.

धोनीच्या आता लेट्स गेट मॅरिड नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याची आता मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. काल या चित्रपटाचा चैन्नईमध्ये एका कार्यक्रमामध्ये ट्रेलर लाँच करण्यात आला. त्याच्या ऑडिओचे देखील यावेळी लाँचिंग करण्यात आले. ही एक तमिळ फिल्म असून त्याचे दिग्दर्शन रमेश थमिलामानी यांनी केले आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

या चित्रपटामध्ये हरीश कल्याण आणि इवाना हे लीड रोलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांनी प्रोड्युस केला आहे. लेट्स गेट मॅरिडची स्टोरी काय असणार याविषयी चर्चा रंगली होती. ती स्टोरी आता समोर आली आहे. मीरा आणि गौतमची ही स्टोरी आहे. त्यात गौतमला काहीही झालं तरी मीराशी लग्न करायचं आहे. मात्र त्यात काही अडचणी आहेत. त्या काय आणि शेवटी गौतम मीराशी लग्न करण्यात यशस्वी होतो का हे प्रेक्षकांना पडद्यावर पाहावे लागणार आहे.

Dhoni sakshi production film
Viral : मांजर पाळताय? सावधान! आधी मालकावर हल्ला करणाऱ्या मांजराचा 'हा' Video पाहा

लेट्स गेट मॅरिड नावाचा चित्रपट हा ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. स्वत धोनी देखील त्याच्या या चित्रपटाविषयी खूपच उत्सूक आहे. त्यानं याविषयी सोशल मीडियावर काही पोस्ट देखील शेयर केल्या होत्या. यापूर्वी खरं तर धोनीच्या आयुष्यावर देखील एक बायोपिक आला होता. त्यात बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंगनं धोनीची भूमिका साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com