बहुप्रतिक्षित 'बाटला हाऊस'चा टीझर प्रदर्शित; जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जुलै 2019

19 सप्टेंबर 2008 ला दिल्लीमधील झाकिर नगर-जामिआ नगर या भागात झालेले 'बाटला हाऊस' चकमक प्रकरण देशभर गाजले होते. या प्रकरणावर आधारित असलेला 'बाटला हाऊस' या हिंदी चित्रपटाचा टीझर आज (बुधवार) प्रदर्शित झाला. 

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अभिनेता जॉन अब्राहम हा या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेत आहे. जॉननेच सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत 'बाटला हाऊस'चा पहिला टीझर लॉन्च केला. 'गोळ्यांचा आवाज अजूनही अकरा वर्षांनंतर ऐकू येतो आहे,' असे ट्विट करत या चित्रपटाचा टीझर जॉनने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. 

2008 साली देशभर गाजलेले बाटला हाऊस प्रकरण या चित्रपटामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात येणार आहे. 19 सप्टेंबर 2008 ला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दक्षिण दिल्लीमधील जामिया नगरमधील एल-१८ बाटला हाऊस येथे दिल्ली पोलिसांच्या विशेष दल आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या चार अतिरेक्यांमध्ये चकमक उडली होती. दोन तास चाललेल्या या चकमकीमध्ये आतिफ अमिन आणि महंम्मद साजिद हे अतिरेकी ठार झाले होते, तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा हे शहीद झाले होते. या घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला जॉन पोलीस अधिकारी  संजय कुमार यादव यांची भूमिका साकारत आहे. बाटला हाऊस येथे जी चकमक उडाली होती त्या चकमकीवेळी संजय कुमार यांनी दिल्ली पोलिसांच्या विशेष दलाचे नेतृत्व केले होते. 19 सप्टेंबरला नक्की काय घडले होते याची दुसरी बाजू चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्मा झाली आहे. बाटला हाऊस हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) प्रदर्शित होणार आहे.

जॉनने या अगोदर फोर्स, ढिश्यूम, मद्रास कॅफे, सत्यमेव जयते या चित्रपटात पोलिसाची भूमिका केली होती. या चित्रपटातही तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मृणाल ठाकूर, रविकिशन, प्रकाश राज, नोरा फतेही हे सहकलाकाराच्या भूमिकेत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Much awaited Batla House teaser released toady John Abraham plays the lead role