काय होतंय दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी, 'वाय' चित्रपटाचा ट्रेलर पाहाच..

बहुचर्चित 'वाय' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून मुक्ता बर्वेसह अनेक दिग्गज कलाकर यात महत्वाच्या भूमिकेत आहेत.
mukta barve Y movie trailer released
mukta barve Y movie trailer releasedsakal
Updated on

Marathi movie : गेली काही दिवस आपल्याकडे 'वाय' (Y) चित्रपाटाची भलतीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे कथानक अद्याप समोर आले नसले तरी हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे (mukta barve) प्रमुख भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून अनेक कलाकार, प्रेक्षक आणि अनेक मान्यवर मंडळी हातामध्ये 'वाय' अक्षर लिहीलेले पोस्टर घेऊन चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर लाॅंच करण्यात आले. यामध्ये मुक्ताचा आक्रमक अंदाज समोर आला. या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होईल याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर तो रिलीज झाला आहे. अत्यंत गूढ उलगडणारा असा हा ट्रेलर आहे. (mukta barve's new marathi movie 'Y' poster release) ( 'Y' marathi movie ) (mukta barve latest news) (mukta barve Y marathi movie trailer released)

mukta barve Y movie trailer released
Photo : पाहा तुमच्या आवडत्या नायिकांनी कशी साजरी केली वटपौर्णिमा..

या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला. सोहळ्याला सिनेमाच्या संपूर्म टीमने हजेरी लावली होती. 'वाय' हा मराठीतील पहिला हायरलिंक सिनेमा आहे. 'वाय' या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. सिनेमा सत्य घटनांवर आधारित असून आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी सिनेमात दाखवण्यात येणार आहे. मल्टिस्टारकास्ट असलेल्या सिनेमात भायण वास्तव समोर येणार आहे.

ट्रेलरमध्ये मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत.या घटनांचा शोध मुक्ता यात घेताना दिलतेय. या घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी घडत आहेत. या घटनांमागचे कारण, करते करविते यांचा शोध मुक्ता घेणार आहे. येत्या २४ जून ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अभिनेत्री प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक हे कलाकार महत्वाच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com