esakal | '..तर कंगनाविरोधात अटक वॉरंट जारी करणार'; कोर्टाने फटकारले
sakal

बोलून बातमी शोधा

kangana Ranaut

'..तर कंगनाविरोधात अटक वॉरंट जारी करणार'; कोर्टाने फटकारले

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेत्री कंगना रणौतविरोधात Kangana Ranaut कवी आणि गीतकार जावेद अख्तर Javed Akhtar यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा defamation case केला आहे. याप्रकरणी आज (१४ सप्टेंबर) सुनावणीदरम्यान कंगना न्यायालयात गैरहजर राहिली. कंगनाची प्रकृती ठीक नसून तिला कोविडची लक्षणं दिसू लागली आहेत, असं तिचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी न्यायालयात स्पष्ट केलं. त्यामुळे तिला न्यायालयात हजर न राहण्यासाठी आठवड्याभराची वेळ द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. त्याचसोबत वैद्यकीय प्रमाणपत्र त्यांनी न्यायालयात सादर केलं. त्यानुसार न्यायालयाने सुनावणीची पुढची तारीख २० सप्टेंबर ठेवली आहे. पुढच्या सुनावणीला कंगना हजर न राहिल्यास तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी करणार असल्याचं न्यायालयाने यावेळी सुनावलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहीन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. न्यायालयाने जुहू पोलीस ठाण्याला यावर चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे की अख्तर यांच्या तक्रारीत तथ्य आहे. त्यामुळे न्यायालयाने कंगनाला फेब्रुवारीमध्ये समन्स बजावले होते. याप्रकरणी अंधेरी न्यायालयात २० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

हेही वाचा: मुनमुनसोबत अफेअरच्या चर्चांवर राजचं सडेतोड उत्तर

हेही वाचा: 'सैराट'मधला परश्या की कबीर सिंग? नव्या लूकवर चाहते फिदा

कंगनाला उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

कंगनाविरोधात दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेली मानहानीच्या खटल्याची कारवाई योग्य आहे असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. कंगनाच्या विरोधात जावेद अख्तर यांनी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यामध्ये न्यायालयाने खटल्याची कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई रद्दबातल करण्यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात याचिका केली असून न्यायालयाने नियमबाह्य पध्दतीने कारवाई केली, असा आरोप याचिकेत केला आहे. कंगनाला न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नसून याचिका नामंजूर केली.

अख्तर यांच्या वतीने एड जे भारद्वाज यांनी बाजू मांडली होती. दंडाधिकारी न्यायालयाने केलेली कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसारच केली आहे. अब्रुनुकसानीच्या फौजदारी दाव्यात आवश्यक असलेल्या तरतुदींचे पालन करण्यात आले आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला होता. तर, पोलिसांनी केलेल्या चौकशीवर ही कारवाई आहे, दंडाधिकारी न्यायालयाने स्वतंत्रपणे चौकशी केली नाही, असा बचाव कंगनाच्या वतीने एड रियाज सिद्दीकी यांनी केला होता.

loading image
go to top