शेजाऱ्याविरोधात सलमानचा मानहानीचा दावा, जाणून घ्या काय आहे प्रकरण? Salman Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salman Khan

शेजाऱ्याविरोधात सलमानचा मानहानीचा दावा, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अभिनेता सलमान खानने (Salman Khan) त्याच्या पनवेल इथल्या फार्महाऊसचा शेजारी केतन कक्कड (Ketan Kakkad) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. केतन यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमानची बदनामी केल्याचा आरोप या खटल्यात केला आहे. मुंबईतील वांद्रे इथे राहणाऱ्या सलमानचा पनवेलमध्ये फार्महाऊस आहे. त्याचप्रमाणे मालाड इथं राहणाऱ्या केतन यांचा पनवेलमध्ये सलमानच्या शेजारीच घर आहे. केतन यांच्याविरोधात सलमानने दाखल केलेल्या खटल्यावर शुक्रवारी मुंबई सिटी सिव्हिल कोर्टाने सलमानच्या पक्षात अंतरिम आदेश देण्यास नकार दिला आहे. न्यायमूर्तींनी केतन कक्कड यांना त्यांचं उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारी रोजी पार पडणार आहे.

कक्कड यांनी यूट्यूबरला मुलाखत देताना त्याची बदनामी केली असा आरोप सलमानने केला आहे. या शोचा भाग असलेल्या इतर दोन लोकांवरही खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय गुगल, युट्युब, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया कंपन्यांचाही त्यात उल्लेख आहे. या कंपन्यांनी त्यांच्या साइटवरून सलमानविरुद्ध बदनामीकारक मजकूर काढून टाकावा अशी मागणी खटल्यातून करण्यात आली आहे.

हेही वाचा: शेफालीसोबतच्या किसिंग सीनविषयी किर्तीचा मोठा खुलासा, "जर माझ्यातील भावना.."

दुसरीकडे केतन यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या खटल्याची कागदपत्रं गुरुवारी संध्याकाळी मिळाली असून त्यांनी संपूर्ण खटला अद्याप नीट वाचला नाही. सलमान खानने खटला दाखल करण्यासाठी महिनाभर वाट पाहिली आहे तर केतन यांना जबाब नोंदवण्यासाठी वेळ मिळायला हवा, असंही वकील आभा सिंह यांनी कोर्टात म्हटलं. त्यानंतर न्यायाधीशांनी सुनावणी पुढे ढकलली. सलमान किंवा त्याच्या फार्महाऊसविरोधात केतन यांनी कोणतीही अपमानास्पद पोस्ट करू नये यासाठी सलमानला कोर्टाकडून आदेश हवा आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainmentsalman khan
loading image
go to top