Chrisann Pereira : 'सडक 2' फेम अभिनेत्रीला ड्रग्ज तस्करीत अडकवल्याप्रकरणी दोघांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

'बाटला हाऊस' आणि 'सडक 2' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री क्रिसन परेरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.
Actress Chrisann Pereira
Actress Chrisann Pereiraesakal
Updated on
Summary

आरोपी प्रॉपर्टीच्या लालसेपोटी किंवा पूर्व वैमनस्यातून याप्रकरणी लोकांना फसवत असावेत. आता पर्यंत याप्रकरणात 4 लोकांना असं फसवलं असल्याचं समोर आलंय.

'बाटला हाऊस' आणि 'सडक 2' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री क्रिसन परेरा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेत्रीवर अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप आहे, त्यामुळं ती संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील शारजाह तुरुंगात बंद आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासानंतर, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. या प्रकरणी अभिनेत्रीला फसवण्यात आल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी 2 जणांना अटकही केली आहे. पॉल अँथनी (34) आणि राजेश बोभाटे उर्फ रवी (42) या दोघांना मंगळवारी गुन्हे शाखेनं अटक केली.

पोलिसांच्या मते, आरोपी प्रॉपर्टीच्या लालसेपोटी किंवा पूर्व वैमनस्यातून याप्रकरणी लोकांना फसवत असावेत. आता पर्यंत याप्रकरणात 4 लोकांना असं फसवलं असल्याचं समोर आलंय. क्रिसनला एक ट्रॉफी देत ती ऑडिशनसाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं होतं. त्याच ट्रॉफीत मिळालेल्या ड्रग्ज प्रकरणात क्रिसनला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

आंतरराष्ट्रीय वेब सीरिजसाठी क्रिसनची निवड

क्रिसन परेराच्या कुटुंबानं गुन्हे शाखेला दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2023 मध्ये प्रेमिला परेरा यांना रवी नामक व्यक्तीकडून रिअल इस्टेट कर्जासाठी फोन आला. त्यानं स्वतःची बिझनेसमन म्हणून ओळख करुन दिली. त्याच काळात तो क्रिसन परेराला भेटला होता, त्यानं सांगितलं की त्यानं टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. रवी नावाच्या या व्यक्तीनं क्रिसनला त्याच्या टॅलेंट पूल टीमशी ओळख करून देण्याची ऑफर दिली. मार्चमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये एका आंतरराष्ट्रीय वेब सीरिजसाठी त्याच्या टीमशी क्रिसनची ओळख करून दिली. यात क्रिसनची निवडही झाल्याचं सांगण्यात आलं.

Actress Chrisann Pereira
Karnataka Election : भाजपला एकाही मुस्लिम मताची गरज नाही; मोदींनी फोन केलेल्या नेत्याचं वादग्रस्त विधान

मुंबई गुन्हे पथकाकडून तपास

हा प्रकार घडल्यानंतर क्रिसनच्या आई-वडिलांना स्थानिक पोलिस स्टेशन गाठलं. पण, तिथं जाऊन काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर मुंबई गुन्हे पथकानं तपास सुरू केला. त्यानंतर वेगळंच कनेक्शन समोर आलं. या सगळ्या प्रकणामागं अॅंथनी पॉल नावाचा व्यक्ती असल्याचं समोर आलं.

Actress Chrisann Pereira
Karnataka Election : कर्नाटकात शेवटच्या क्षणी भाजपचीच सत्ता येणार; अमित शहांचा मोठा दावा

क्रिसनला अडकवण्याचा प्लॅन

ज्याची बहीण परेरा राहतात त्याच बिल्डींगमध्ये राहते. त्याच्या बहिणीचा आणि क्रिसनची आई यांच्यात अनेकदा वाद झाले होते. एकदा कोरोना काळात मास्क न घ्यातल्यानं दोघींमध्ये बाचाबाची झाली होती, तर एकदा कुत्र्याच्या भुंकण्यावरून दोघींमध्ये वाद झाला होता. त्यामुळं त्यानं अॅंथनी यानं क्रिसनला अडकवण्याचा प्लॅन बनवला होता. यापूर्वीही त्यानं काही जणांनाअशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न केला होता.

Actress Chrisann Pereira
Karnataka Election : रात्रंदिवस मेहनत करायला लागली तरी चालेल, पण शेट्टरांना..; येडियुरप्पांचं थेट चॅलेंज

कोण आहे क्रिसन परेरा?

क्रिसन परेरा ही बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिनं सडक 2, बाटला हाऊस, थिंकीस्तान यांसारख्या चित्रपटात काम केलंय. क्रिसन सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचे इन्स्टाग्रामवर 12 हजारांहून जास्त फॉलोवर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com