esakal | Mumbai Diaries 26/11 : मोहितकडून 'फ्रंटलाइन वर्कर्स'ला सलाम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Diaries 26/11 : मोहितकडून 'फ्रंटलाइन वर्कर्स'ला सलाम

Mumbai Diaries 26/11 : मोहितकडून 'फ्रंटलाइन वर्कर्स'ला सलाम

sakal_logo
By
युगंधर ताजणे

आपल्या वेगळ्या विषयामुळे सध्या चर्चेत आलेल्या मुंबई डायरीज २६/११ (mumbai diaries 26/11) नं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. हटके विषय, त्याची प्रभावी मांडणी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी जरी या विषयावर अनेक चित्रपट आणि मालिका आल्या असल्या तरी या सीरिजमधून फ्रंटलाईन वर्कर्सला देण्यात आलेलं स्थान अनेकांसाठी कौतूकाचा विषय ठरतो आहे. या मालिकेबदद्लच्या वेगवेगळ्या आठवणींना अभिनेता मोहित रैनानं उजाळा दिला आहे. त्यात त्यानं मालिका निर्मितीच्या वेळी जे अनुभव आले त्याविषयी सांगितलं आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओची आगामी ओरिजिनल सीरीज ‘मुंबई डायरीज़ 26/11’ दर्शकांसाठी बहुप्रतीक्षित सीरीज आहे, याचे एक खास कारण म्हणजे या सीरीजमध्ये दिसणारी स्टारकास्ट ज्यांनी 26/11च्या आतंकवादी हल्ल्याची एक वेगळी बाजू दाखवली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना मोहित रैनानं सांगितलं की, डॉक्टरांचा मुलगा असल्याने त्या दिवसांमध्ये पुन्हा जाणं आणि त्याच प्रकारची भूमिका करायला मिळणं हा एक वेगळ्या प्रकारचा योगायोग म्हणावा लागेल. एक मुलगा म्हणून मी खूप भाग्यवान राहिलो आहे कारण माझे वडील डॉक्टर आहेत. ते काश्मीरमधील गावांच्या बाहेरील भागात सेवेवर होते. दिवसाच्या अखेरीस, जेव्हा ते घरी यायचे तेव्हा प्रत्येक रात्री आपत्कालीन परिस्थितीमुळे आमचे दार अनेक वेळा ठोठावले जायचे. त्यामुळे त्यांना पुन्हा कोणाला तरी पहायला जावे लागत असे. दिवसाच्या अखेरीस देखील ते रुग्णांना तपासायचे. त्यांना मदत करायचे. ते जेव्हा परत येत, तेव्हा मी त्याच्या हावभावावरून समजत असे की ते रुग्णाला वाचवलं आहे की नाही, त्यांच्या संपूर्ण क्षमतेनुसार ते त्यांनी त्याला मदत केली किंवा नाही हेही यावेळी मला समजायचं. आता जेव्हा या सीरिजमध्ये मी डॉक्टरांच्या भूमिकेत गेलो तेव्हा त्याचा मला खूप फायदा झाला.

त्यामुळे मी आधीपासूनच फ्रंटलाइन वर्कर्सची कामाप्रतीची उत्कटता अनुभवू शकलो. त्यांच्याकडून प्रेरित होऊ शकलो हे माझे भाग्य आहे. आणि कदाचित हे मालिकेत देखील उमटले आहे. ज्याचा भाग बनून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. अशी भावना मोहितनं व्यक्त केलीय. निखिल अडवाणीद्वारे रचित, एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी निर्मित आणि निखिल अडवाणी आणि निखिल गोन्सालविस सहदिग्दर्शित ‘मुंबई डायरीज 26/11’ ही मालिका, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचारी ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. या मालिकेमध्ये ज्यात कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई, श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे आणि प्रकाश बेलावडी सारखे अनेक प्रतिभावान कलाकार आहेत.

हेही वाचा: 'मुंबई डायरीज 26/11' मधुन अनुभवता येणार क्रौर्याची थरारक गोष्ट

हेही वाचा: Sushant Singh Rajput Death: पटना उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश

loading image
go to top