अभिनेता सोनू सूदचा लोकल ट्रेन पास व्हायरल, वाचा जुनी आठवण पाहून सोनू काय म्हणाला?

sonu local pass
sonu local pass

मुंबई- लॉकडाऊनमध्ये कामानिमित्त ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांना अभिनेता सोनू सूद त्यांच्या घरी पाठवण्यासाठी मदत करतोय. या कठीण प्रसंगी लोकांना मोलाची मदत करणा-या सोनूला लोक देवदूत मानत आहेत. पडद्यावर कधी हिरो कधी विलन साकारणारा सोनू ख-या आयुष्यातही लोकांचा हिरो बनलाय. त्याच्या या कामाने त्याला अनेक आशिर्वाद मिळाले आहेत. अशातंच सोनूला त्याच्या जुन्या दिवसांची एका चाहत्याने आठवण करुन दिली आहे. 

सोशल मिडियावर सोनू सूदचा लोकल ट्रेनचा पास मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एका ट्वीटर युजरने हा लोकल पास त्याच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. १९९७ सालचा हा पास आहे जेव्हा सोनू २४ वर्षांचा होता. या पासमध्ये सोनूचं नावं आणि त्याचा फोटो दिसून येतोय.

बोरिवली ते चर्चगेट असा एक महिन्याचा ४२० रुपयांचा हा पास आहे. ट्वीटरवर ज्याने हा पास शेअर केला आहे त्याने सोनूला टॅग करत ट्वीट केलंय की, 'ज्याने खरंच स्वतः संघर्ष केला आहे त्यालाच इतरांचा त्रास समजु शकतो. अभिनेता सोनू सूद कधीकाळी ४२० रुपयांच्या लोकल पासने प्रवास करत होता.' 

विशेष म्हणजे सोनू सूदही त्याचे ते जुने संघर्षाचे दिवस विसरलेला नाही. त्या ट्वीटर युजरने सोनूला टॅग केलेल्या पोस्टला सोनूने उत्तर दिलंय. सोनूने ती पोस्ट रिट्वीट करत लिहिलंय, 'आयुष्य हे गोल आहे.'

सोनू सूद सध्या अनेकांसाठी देवापेक्षा कमी नाहीये. कित्येक ठिकाणी अडकलेल्या लोकांना त्याने स्वतः रस्त्यावर उतरुन घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. एका मुलाखतीमध्ये सोनूने सांगितलं होतं की तो या स्थलांतरित मजुरांची मदत करत आहे कारण कधीकाळी तो स्वतः देखील असाच एक प्रवासी होता. त्याने सांगितलं की कामाच्या शोधात त्याला मुंबईला यावं लागलं होतं. त्यामुळे तो या अनोळखी जागांवर अडकलेल्या प्रवाशांचा त्रास समजू शकतो.  

mumbai local train ticket of sonu sood got viral  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com