esakal | सुशांतच्या घरातून पोलिसांनी लॅपटॉप आणि कागदपत्र केली जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

sushant

सुशांतच्या मृत्युनंतर दोन दिवसांनी म्हणजेच मंगळवारी पोलिसांची एक टीम त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी पोलिसांनी तेथील सर्व कागदपत्र आणि त्याचा लॅपटॉप अधिक तपासणीसाठी जप्त केला.

सुशांतच्या घरातून पोलिसांनी लॅपटॉप आणि कागदपत्र केली जप्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. कोणी त्याच्या व्यावसायिक गोष्टींशी संबंध जोडतायेत तर कोणी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात असलेल्या अडचणीशी संबंध जोडतायेत. अनेक राजकारणी आणि चाहत्यांना वाटतंय की सुशांत हा बॉलीवूडच्या नेपोटिजमचा शिकार झाला आहे. ज्यामुळे त्याला नैराश्य येऊन त्याने आत्महत्या केली असावी असं म्हटलं जातंय. मात्र या सगळ्या जर तर च्या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत. सुशांतशी संबंधित सर्व कागदपत्र आणि पुराव्यांचा ते कसून तपास घेत आहेत. 

हे ही वाचा: घराणेशाहीवर पायल रोहतगी भडकली, आयुष शर्मावरुन सलमानवर साधला निशाणा

अंकिताच्या उपस्थितीत लॅपटॉप केला जप्त

सुशांतच्या मृत्युनंतर दोन दिवसांनी म्हणजेच मंगळवारी पोलिसांची एक टीम त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी पोलिसांनी तेथील सर्व कागदपत्र आणि त्याचा लॅपटॉप अधिक तपासणीसाठी जप्त केला. असं सांगितलं जातंय की जेव्हा पोलिसांची ही टीम सुशांतच्या घरी पोहोचली होती तेव्हा त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांव्यतिरिक्त एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे देखील उपस्थित होती. याआधी देखील पोलिसांची एक टीम सुशांतच्या घरी तपासणी साठी गेली होती. 

सुशांतच्या मृत्युनंतर लगेचच मुंबई पोलिसांनी पहिल्या तपासणीसाठी त्याचाय मोबाईल जप्त केला होता. या मोबाईलचा पासवर्ड सुशांतच्या मॅनेजरकडे असायचा. मोबाईल व्यतिरिक्त पोलिसांनी सुशांतची डॉक्टरची फाईल देखील जप्त केली होती. 

सुशांत गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यामध्ये होता. असं म्हटलं जातंय की जप्त केलेल्या कागदपत्र, लॅपटॉप आणि मोबाईलद्वारे पोलिस हे शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत की खरंच सुशांतवर काही लोकांद्वारे दबाव टाकण्यात येत होता का?   

mumbai police seized documents and laptop of sushant singh rajput for further investigation  

loading image
go to top