esakal | मुंबईच्या पावसाचा फटका मराठी कलाकारांनाही; अडकले ट्रॅफिक जाममध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

renuka shahane faces problem in mumbai rains

मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून मुंबईची पुन्हा एकदा तुंबई होणार का अशी भिती व्यक्त केली जात आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने अनेक मराठी कलाकारंनादेखील याचा जबरदस्त फटका बसला आहे.

मुंबईच्या पावसाचा फटका मराठी कलाकारांनाही; अडकले ट्रॅफिक जाममध्ये

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून मुंबईची पुन्हा एकदा तुंबई होणार का अशी भिती व्यक्त केली जात आहे. अनेक भागांत पाणी साचल्याने अनेक मराठी कलाकारंनादेखील याचा जबरदस्त फटका बसला आहे. अभिनेत्री रेणूका शहाणे, अभिनेता जितेंद्र जोशी, अभिजीत खांडेकर, तेजश्री प्रधान या मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या गैरसोयीची माहिती आणि फोटो शेअर केले आहेत. 

अभिनेत्री रेणूका शहाणे हिने फेसबूकच्या माध्यामातून एक पोस्ट शेअर केली आहे. तिची गाडी पाण्यामध्ये अडकली आणि घुडघ्याभर पाण्यामध्ये ती अडकली होती. याविषयीची पोस्ट आणि फोटो तिने अपलोड केले आहेत.
तर दुसरीकडे अभिनेत्री तेजश्री प्रधान हीला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. पवईला शुटिंगसाठी जात असताना ती वाहतूक कोंडीमध्ये अडकली.

अभिनेता जितेंद्र जोशी पवई ते जेव्हिएलआरला जाताना वाहतूक कोंडीमध्ये फसला. याविषयी त्याने एक ट्विट केलं आहे. ‘आज की ताजा खबर..पवई ते जेव्हाएलआर पाच किमी यायला तीन तास, अजूनही रहदारी मुंगीच्या गतीने,’ असं त्याने लिहिलं आहे. #खड्डे आणि बरंच काही असा हॅशटॅग त्याने वापरला आहे.

वाहतूक कोंडीशिवाय दिड दिवसाच्या गणपती विसर्जन मिकवणूकांचीदेखील अडचण झाली. हवामान खात्याकडून काही वेळा पूर्वी ऑरेंज अर्लट देण्यात आला होता. मात्र आता वाढत्या पावसामुळे तो वाढवून रेड अर्लट करण्यात आला आहे. अनेक शुटिंग रद्द ही करण्यात आले आहेत.

loading image
go to top