Munawar Faruqui Bigg Boss 17 Winner : 'मी जिंकलो त्याचं सारं श्रेय हे...', मुनावरनं कुणाचं घेतलं नाव?

बिग बॉसच्या १७ व्या पर्वाचा विजेता म्हणून मुनावर फारुखीचं नाव समोर आलं आहे.
Munawar Faruqui Bigg Boss 17 Winner
Munawar Faruqui Bigg Boss 17 Winneresakal

Munawar Faruqui Bigg Boss 17 Winner : बिग बॉसच्या १७ व्या पर्वाचा विजेता म्हणून मुनावर फारुखीचं नाव समोर आलं आहे. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला आहे.गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ सुरु असणाऱ्या बिग बॉसमधून मुनावरनं चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले होते.

अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी, मनारा चोप्रा, अंकिता लोखंडे आणि मुनावर शेख हे टॉपमधील स्पर्धक होते. त्यात सर्वाधिक स्पर्धा ही अभिषेक आणि मुनावरमध्येच होती असे अनेकांचे म्हणणे होते. त्यात अखेर मुनावरनं विजेता म्हणून आपली मोहोर उमटवली आहे. या सगळ्यात त्यानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

पीटीआयला दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये मुनावरनं म्हटलं आहे की, माझ्या यशाचे श्रेय हे मलाच मी देतो. त्याला कारण म्हणजे आजवरच्या आयुष्यात ज्याला सामोरं गेला आहे त्यातील अपयशातून मला खूप काही शिकायला मिळाले आहे. मला जे अपयश आले त्याचा मी सामना केला आहे. तसेच माझी अभिषेक, मनारा आणि अंकितासोबतची मैत्री ही कायम राहिल. असेही मुनावरनं यावेळी सांगितले.

जे काही घडलं ते सगळं माझ्यामुळेच....

मुनावरनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, या शो च्या निमित्तानं माझ्यात जे काही होतं ते मी पूर्ण ताकदीनं उपयोगात आणलं. त्या टँलेंटचा वापर केला. त्यामुळे जे यश मला मिळाले आहे त्याचे श्रेय हे माझेच आहे. माझ्या कर्माचे फळ मला मिळाले आहे. ती मेहनत रंगली आहे. या सगळ्यात माझे मित्र परिवार, कुटूंबीय यांचे योगदानही विसरता येणार नाही.

मला माहिती आहे की, कधी कधी मित्रांमध्ये नाराजीचा सूर असतो. त्यांच्यातील वादही मला काही नवीन नाही. त्यामुळे त्यांच्याशी कमी बोलणे, अबोला धरणे याच्या अनेक परिणामांना मला सामोरं जावं लागलं आहे. मात्र काही नाती अशी असतात ती तुमच्या परिवाराबाहेरही तुम्हाला साथ करतात. अशा शब्दांत मुनावरनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यासोबतच त्याला ५० लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे. याशिवाय त्याला एक अलिशान कारही गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे. यावेळी मुनावरला सपोर्ट करण्यासाठी शो मध्ये त्याची बहिण आणि बिग बॉसच्या गेल्या सीझनमधील विजेता एमसी स्टॅनही हजर होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com