Munawar Faruqui: ५ वर्षांचा मुलगा ते तुरुंगवास.. बिग बॉस विजेत्या मुनावरबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

मुनावर फारुकी बिग बॉस 17 चा किताब जिंकला आहे
Munawar Faruqui bigg boss 17 winner unknown facts age affair
Munawar Faruqui bigg boss 17 winner unknown facts age affairSAKAL

Unknown Facts About Munawar Faruqui: स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारुकीने रविवारी लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" च्या 17 व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. 32 वर्षीय मुनावरला ₹ 50 लाखांचे रोख बक्षीस आणि एक कार बक्षीस म्हणून मिळाली. बिग बॉस 17 चा विजयी स्पर्धक मुनावर फारुकीबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या.

Munawar Faruqui bigg boss 17 winner unknown facts age affair
Munawar Faruqui: बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर मुनावरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला.."डोंगरीमध्ये आज.."

मुनावरबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

1. मुनावर फारुकीचा जन्म गुजरातमधील जुनागढ येथे झाला. मुनावर एक यूट्यूबर, स्टँड-अप कॉमेडियन आणि रॅपर म्हणून लोकप्रिय आहे.

2. मुनावर फारुकीचं लग्न झालं असून त्याला एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. पण त्याने त्याच्या पत्नीला २०२२ साली घटस्फोट दिलाय. तो सध्या सोशल मीडिया स्टार नाझिला सिताईशीला डेट करत आहे.

3. स्टँड-अप शो दरम्यान हिंदू देवतांवर भाष्य केल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्याच्याविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यामुळे 2021 मध्ये एक महिना तुरुंगावास भोगलाय.

4. आजूबाजूच्या तीव्र संतापानंतर मुनावरने जाहीर केले की, तो उजव्या विचारसरणीच्या गटांच्या धमक्यांमुळे त्याचे 12 शो दोन महिन्यांत रद्द झाले. त्यामुळे तो कॉमेडी करणं सोडणार आहे.

5. 2022 मध्ये, मुनावरने रिॲलिटी टीव्ही शो "लॉक अप" द्वारे पुनरागमन केले. जेथे सहभागी स्पर्धक "जेल" मध्ये राहत होते. या शोचा पहिला सीझन मुनावरने जिंकला होता.

मुनावर विजयी झाल्याने त्याचे फॅन्स जल्लोष करत आहेत. मुनावरने पुन्हा एकदा त्याचा खेळ आणि हुशारी सिद्ध केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com