Munawar Faruqui : फारूकीचा शो रद्द करा; विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली पोलिसांना पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munawar Faruqui Latest News

Munawar Faruqui : फारूकीचा शो रद्द करा; विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली पोलिसांना पत्र

Munawar Faruqui Latest News विश्व हिंदू परिषदेने (VHP) दिल्ली पोलिसांना पत्र लिहून स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारूकीचा (Munawar Faruqui) २८ ऑगस्ट रोजी दिल्लीतील सिविक सेंटरमध्ये होणारा शो रद्द करण्याची मागणी केली आहे. फारुकीचा शो रद्द न केल्यास विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असे हिंदू संघटनेने म्हटले आहे. विहिंपने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

मुनावर फारूकी (Munawar Faruqui) नावाचा कलाकार २८ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या सिविक सेंटरमधील केदारनाथ स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करीत आहे. तो शोमध्ये हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवतो. यामुळे नुकतेच हैदराबादमधील भाग्यनगरमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता, असे विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) पत्रात लिहिले आहे.

हेही वाचा: दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन; १९ हून अधिक चित्रपटांची निर्मिती

तुम्हाला विनंती करतो की हा शो तात्काळ रद्द करा. अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते शोचा निषेध करेल आणि प्रदर्शन करतील. तुम्हाला विनंती आहे की, शो तात्काळ थांबवावा. कृपया योग्य कारवाई करा आणि माहिती द्या, असेही पत्रात म्हटले आहे.

हैदराबादमध्ये स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारूकीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या किमान ५० जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला.

Web Title: Munawar Faruqui Cancel Show Letter Delhi Police Vishwa Hindu Parishad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policedelhiwrite letter