VIDEO: मुनव्वर फारुकीनं घेतली सचिन तेंडुलकरची विकेट, स्टेडियममध्ये पसरली शांतता; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

Munawar Faruqui And Sachin Tendulkar: एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुनव्वर फारुकीनं टाकलेल्या चेंडूवर सचिन हा आऊट झाला आहे.
Munawar Faruqui,Sachin Tendulkar
Munawar Faruqui,Sachin Tendulkaresakal
Updated on

Munawar Faruqui And Sachin Tendulkar: इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या पहिल्या सीझनला सुरुवात झाली. या सीझनच्या उद्घाटन सोहळ्याला अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या प्रीमियर लीगमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) (मास्टर XI) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) (खिलाडी XI) यांच्या टीमममध्ये एक मॅच झाली. या सामन्यात सचिनचा संघ 5 धावांनी जिंकला. या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची सध्या चर्चा सुरु आहे.

नमन ओझानं कॅच पकडला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्टँड-अप कॉमेडियन आणि बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकी हा बॉलिंग करताना दिसत आहे तर सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना दिसत आहे. मुनव्वर फारुकीनं टाकलेल्या चेंडूवर सचिन हा कॅचआऊट झाला. नमन ओझानं कॅच पकडला, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

स्टेडियममध्ये शांतता पसरली

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सचिन बाद झाल्यानंतर स्टेडियममध्ये शांतता पसरलेली दिसत आहे. तसेच सचिनला आऊट केल्यानंतर मुनव्वर आनंदी झालेला दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या सामन्यात मास्टर-11 ही टीम विजेती ठरली. या टीमनं 7 आऊट आणि 94 रन्स असा स्कोर केला. तर अक्षयच्या टीमनं 6 आऊट आणि 89 धावा केल्या. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या सामन्यात सचिननं 17 चेंडूत 30 धावा केल्या.

इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगचा उद्देश नवीन खेळाडूंना शोधणे, प्रशिक्षण देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे आहे. या प्रीमियर लीगच्या पहिल्या सीझनमध्ये सहा संघ सहभागी होतील. ज्यांचे मालक हिंदी, तमिळ आणि तेलुगु चित्रपटांतील सुपरस्टार आहेत. अमिताभ बच्चन हे 'माझी मुंबई' टीमचे मालक आहेत तर अक्षय कुमार हा श्रीनगर के वीर टीमचा मालक आहे. तसेच हृतिक रोशन हा बेंगळुरू स्ट्रायकर्स टीमचा मालक आहे. राम चरण फाल्कन रायझर्स हैदराबादचा, सूर्या चेन्नई सिंघमचा, सैफ अली खान आणि करीना हे टायगर्स ऑफ कोलकाता या टीमचे मालक आहेत. या स्पर्धेत एकूण 18 सामने खेळले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com