esakal | 'तारक मेहता..'मधील बबिता-टप्पू एकमेकांना करतायत डेट
sakal

बोलून बातमी शोधा

'तारक मेहता..'मधील बबिता-टप्पू एकमेकांना करतायत डेट

'तारक मेहता..'मधील बबिता-टप्पू एकमेकांना करतायत डेट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिकेत बबिता आणि टप्पूची भूमिका साकारणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत आहेत. या मालिकेत अभिनेत्री मुनमुन दत्ता Munmun Dutta बबिताची तर अभिनेता राज अनाडकत Raj Anadkat हा टप्पूची भूमिका साकारतोय. या दोघांच्या वयात नऊ वर्षांचं अंतर आहे. राज २४ वर्षांचा आहे तर मुनमुन ३३ वर्षांची आहे. सोशल मीडियावरील मुनमुनच्या फोटोंवर अनेकदा राजच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा याआधीही अनेकदा झाल्या आहेत. मात्र या चर्चा खऱ्या असल्याचं वृत्त 'ई टाइम्स'ने दिलं आहे.

'तारक मेहता..'च्या टीममध्ये सर्वांना या दोघांच्या अफेअरबद्दल माहित आहे. इतकंच नव्हे तर मुनमुन आणि राजच्या कुटुंबीयांनाही त्यांच्याविषयी माहित असल्याचं कळतंय. गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत. डिसेंबर २०२० मध्ये या दोघांच्या डिनर डेटचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

हेही वाचा: सचिन-सुप्रिया पिळगावकरांची गोवा ट्रिप; पहा फोटो

'तारक मेहता..' या मालिकेत मुनमुन अगदी सुरुवातीपासूनच बबिताची भूमिका साकारत आहे. तर मोठ्या टप्पूच्या भूमिकेसाठी राजने नंतर या मालिकेत एण्ट्री केली. राजने याआधी काही मालिकांमध्ये काम केलं आहे.

loading image
go to top