संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे वेबविश्वात पदार्पण; वाचा सविस्तर

संतोष भिंगार्डे
Wednesday, 15 July 2020

दहा भागांच्‍या या सिरीजमध्‍ये उदयोन्‍मुख प्रतिभावान रित्विक भौमिक हिंदुस्‍तानी शास्‍त्रीय कलाकार राधेच्‍या भूमिकेत आणि श्रेया चौधरी पॉपस्‍टार तमन्‍नाच्‍या भूमिकेत आहे. अभिनेते नसीरूद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, कुणाल रॉय कपूर, शीबा चड्ढा आणि राजेश तेलंग यांसारखे दिग्‍गज कलाकार यामध्ये काम करीत आहेत.

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे संगीतकार म्हणजे शंकर-एहसान-लॉय. आतापर्यंत या त्रिकुटाने रसिकांचे आपल्या संगीताने चांगले मनोरंजन केले. आता ते वेबविश्वात पदार्पण करीत आहेत. बंदिश बँडिट्स या वेबसीरीजचा साऊंट ट्रॅक त्यांनी बनविला आहे. ही एक रोमँटिक संगीतमय वेबसीरीज आहे. 

'मॅनहोलमध्ये वाहून गेल्यास तुम्हीच जबाबदार'; महापालिकेने लावला 'त्या' ठिकाणी सूचना फलक...

अमृतपालसिंह बिंद्रा यांची ही निर्मिती आहे तर आनंद तिवारी यांनी ती दिग्दर्शित केली आहे. दहा भागांच्‍या या सिरीजमध्‍ये उदयोन्‍मुख प्रतिभावान रित्विक भौमिक हिंदुस्‍तानी शास्‍त्रीय कलाकार राधेच्‍या भूमिकेत आणि श्रेया चौधरी पॉपस्‍टार तमन्‍नाच्‍या भूमिकेत आहे. अभिनेते नसीरूद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, कुणाल रॉय कपूर, शीबा चड्ढा आणि राजेश तेलंग यांसारखे दिग्‍गज कलाकार यामध्ये काम करीत आहेत.

ठाणे जिल्हा परिषदेवर पुन्हा भगवा; अध्यक्षपदी लोणे, तर उपाध्यक्षपदी पवार 

शंकर-एहसान-लॉय यांच्या सुमधुर संगीतामधून ही कथा सांगण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात ही वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक आनंद तिवारी म्हणाले, की प्रत्येक पात्र अद्वितीय आहे आणि कथादेखील लक्षवेधक आहे. ही कथा प्रेक्षकांची उत्सुकता ताणणारी आहे.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: music director shankar ehsaan loy debuted in web world,read full story