Nandu Ghanekar Passed Away: लोकप्रिय संगीतकार नंदू घाणेकर अनंतात विलीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nandu ghanekar, nandu ghanekar passed away

Nandu Ghanekar Passed Away: लोकप्रिय संगीतकार नंदू घाणेकर अनंतात विलीन

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध संगीतकार नंदू घाणेकर यांचं निधन झालंय. ‘ताऱ्यांचे बेट’, ‘शाली’’, ‘सुनंदा’, ‘नशीबवान’ अशा सिनेमांना त्यांनी संगीत दिले होते. याशिवाय काही संगीत अल्बमची निर्मितीही केली होती. वयाच्या ६५ व्या वर्षी मुलुंड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नंदू घाणेकर यांच्या पार्थिवावर ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचे बंधू नंदू घाणेकर यांनी गेली अनेक वर्षे संगीत दिग्दर्शन केले. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवला होते.

नंदू घाणेकर यांच्या पार्थिवावर ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नंदू घाणेकर यांनी अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी नावलौकिक मिळवला. एक हरहुन्नरी कलाकार आपल्यातून आज सोडून गेल्याने मराठी संगीतक्षेत्रावर शोकाकुल वातावरण झालं आहे.

नंदू घाणेकर यांनी आजवर मराठी सिनेमांना सुपरहिट संगीत दिले. नंदू यांनी संगीतबद्ध केलेली गाणी कायम रसिकांच्या स्मरणात राहतील. नंदू यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वातून अनेक कलाकारांनी आणि संगीतकारांनी हळहळ व्यक्त केलीय. नंदू घाणेकर यांचे गिरीश घाणेकर सुप्रसिद्ब दिग्दर्शक आहेत. दोघाही घाणेकर भावंडांनी मराठी मनोरंजन विश्वात राहून कलेची सेवा केली. नंदू घाणेकर यांच्या निधनामुळे मराठी इंडस्ट्रीतील एक उत्कृष्ट संगीतकार आपण गमावला अशी हळहळ व्यक्त होतेय