गायक गुरु रांधवा सोबतच्या 'त्या' मिस्ट्री गर्लचा खुलासा

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 8 January 2021

गुरु रांधवाने त्याचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत एक मुलगी डान्स करताना दिसतेय. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे गुरु चर्चेत आला होता.

मुंबई- गुरु रांधवाने केवळ पंजाबी इंडस्ट्रीतंच नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये देखील मोठं नाव बनवलंय. तुम्हारी सुलु, साहो सारख्या सिनेमांना सुपरहिट गाणी दिल्यानंतर गुरु खुपंच प्रसिद्ध झाला. सोशल मिडियावर त्याची फॅन फॉलोईंग वाढली. त्याच्या प्रत्येक नवीन प्रोजेक्टवर चाहते लक्ष ठेवून असतात. एक दिवसापूर्वीच गुरु रांधवाने त्याचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्याच्यासोबत एक मुलगी डान्स करताना दिसतेय. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे गुरु चर्चेत आला होता.

हे ही वाचा: रेमो डिसूजाचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल, १ महिन्यापूर्वी आला होता हृदयविकाराचा झटका  

गुरुने हा फोटो पोस्ट करत 'नवीन वर्ष , नवी सुरुवात' असं लिहिलं होतं. त्यामुळे त्याच्या चाहत्यानी तो लवकरच लग्न करणार असल्याचा अंदाज लावायला सुरुवात केली. नोरा फतेही, जॅकली फर्नांडिस सारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी गुरुच्या या फोटोवर कमेंट कर शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांना आता तो पाठमोरा चेहरा कोणाचा आहे हे पाहण्याची आणि तिच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. चाहते आणि मिडियाला ही मिस्ट्री गर्ल कोण आहे यामध्ये रस होता. त्याच्या या फोटोला ९ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं होतं. मात्र आता सगळे अंदाज खोटे ठरवत या गोष्टीचा खुलासा केला गेला आहे. 

गुरु रांधवासोबत या फोटो असलेली ही मुलगी आहे अभिनेत्री संजना सांघी. गुरुने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला असून तिच्यासोबतचा दुसरा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिलंय, 'नवीन वर्ष, नवीन गाणं संजना सांघीसोबत.' रॅपर बादशाहसारख्या अनेक सेलिब्रिटींनी यावर कमेंट केली आहे. यावर अनेकजण म्हणत आहेत की गुरु रांधवाने जानेवारी महिन्यातंच लोकांचा एप्रिल फुल केला आहे. अभिनेत्री संजना सांघी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'मध्ये दिसून आली होती.   

mystery girl in guru randhawa photo revealed she is actress sanjana sanghi who will be seen in a music video with singer  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mystery girl in guru randhawa photo revealed she is actress sanjana sanghi who will be seen in a music video with singer