रेमो डिसूजाचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल, १ महिन्यापूर्वी आला होता हृदयविकाराचा झटका

remo
remo

मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्गज सिने दिग्दर्शक रेमो डिसूजाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होत आहे. सोशल मिडियावर ऍक्टीव्ह असणा-या रेमोने नुकताच त्याचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो जीममध्ये वर्कआऊट करताना दिसतोय. रेमोने सफेद रंगाचे शूज, ग्रे पॅन्ट आणि काळ्या रंगाची कॅप घातलेली दिसून येतेय. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी त्याने जो काळ्या रंगाचा मास्क वापरला आहे तो देखील मजेशीर आहे. 

रेमो डिसूजाच्या दोन्ही हातांमध्ये डंबल्स असून तो बायसेप्ससाटी वर्कआऊट करत आहे. त्याच्या बाजुला उभी असलेली जीम प्रशिक्षक त्याला ट्रेनिंग देत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक इंग्रजी गाणं वाजत आहे ज्याचे बोल असे आहेत की जर तुम्ही देवावर विश्वास ठेवता तेव्हा सगळं काही शक्य असतं. तुम्हाला एवढंच फक्त करायचं आहे की देवावर विश्वास ठेवायचा आहे.

हा व्हिडिओ शेअर करत रेमोने सुंदर कॅप्शन दिलंय. त्याने लिहिलंय, 'कमबॅक नेहमीच सेटबॅकपेक्षा जास्त  स्ट्राँग असतं. आजच सुरुवात केली आहे. हळू हळू का होईना पण सुरुवात तर आहे.' रेमोद्वारे शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. चाहते रेमोच्या फॅनपेजवर शेअर करत आहेत आणि प्रार्थना करत आहेत की त्यांचा आवडता डान्स कोरिओग्राफर लवकर पहिल्यासारखा ठीक होवो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

'एबीसीडी', 'रेस' आणि 'एबीसीडी २' सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलेले कोरिओग्राफर रेमो डिसुजाचा काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याचे चाहते खूप काळजीत पडले होते. रेमोने ब-यापैकी लवकर स्वतःला बरं केलं आहे. रेमो डिसुजाच्या पत्नीने काही दिवसांंपूर्वी एक पोस्ट केली होती ज्यामध्ये तिने वाईट काळात पाठिशी उभं राहिल्याबद्दल सलमान खानचे आभार मानले होते.  

remo dsouza hits the gym post health scare comeback is always stronger than the setback  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com