५० हजारांसाठी Naatu Naatu गाजवणारा कोरियोग्राफर प्रेम रक्षित करणार होता आत्महत्या.. पण एका सायकलने.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

naatu naatu choreographer prem rakshit wanted to commit suicide know why

५० हजारांसाठी Naatu Naatu गाजवणारा कोरियोग्राफर प्रेम रक्षित करणार होता आत्महत्या.. पण एका सायकलने..

naatu naatu choreographer prem rakshit : चित्रपट जगतात सर्वोच्च मानाला जाणारा ऑस्कर पुरस्कार आज लॉसएंजलिस येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यंदाचे वर्ष भारतीयांसाठी खूपच महत्वाचे ठरले.

कारण अवघ्या भारताचे लक्ष लागले होते ते 'एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याकडे. या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले होते आणि अखेर 'नाटू नाटू'नं ऑस्कर पटकावला. या बातमीने देशभरात जल्लोष साजरा होत आहे.

हे गाणे आणि यावरील नाच इतका जबरदस्त आहे की सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला होता. एवढेच नाही तर ऑस्कर मध्येही हे गाणे सादर झाले. आणि इतका भन्नाट नाच पाहून उपस्थित सर्व कलाकार भारावले. सर्वांनी या गाण्याला उभं राहुल टाळ्यांची दाद दिली.

ही कमाल होती ती 'नाटू नाटू' या गाण्यावर बसवण्यात आलेल्या डान्सची.. आजवर कुठेही पाहिला नाही असा जबरदस्त डान्स या गाण्यात पाहायला मिळाला. दोन कलाकार संपूर्ण गाण्यात इतक्या वेगवेगळ्या स्टेपवर एकत्र एकसारखं नाचतात याचं सर्वत्र कौतुक झालं. आणि किमया केली ती गाण्याचे कोरिओग्राफर प्रेम रक्षित याने..

(naatu naatu choreographer prem rakshit wanted to commit suicide know why)

प्रेम रक्षित आज एक नामवंत नृत्य दिग्दर्शक आहे. आजवर त्याने १००० हून अधिक गाण्यांवर कोरिओग्राफी केली आहे. पण त्याच्या गाण्याला मिळालेला हा पहिलाच ऑस्कर पुरस्कार आहे. त्यामुळे त्याच्यासाठीही ही खूप मोठी भावना आहे. आज त्याच्या कोरिओग्राफीने ऑस्कर गाजवला असला तरी हाच प्रेम रक्षित एक दिवस आत्महत्या करायला गेला होता. आज तिथून मागे फिरला म्हणून आजचा दिवस तो पाहू शकला.. झालं असं की..

''प्रेम रक्षित याचं कुटुंब सुखवस्तू घरांपैकी एक होतं. घरात सगळ्या सोई-सुविधा आणि सुबत्ता होती.त्याचे वडील हिऱ्यांचे व्यापारी असल्याने पैसा बराच होता. कौटुंबिक वादामुळे रक्षितच्या वडिलांना या व्यवसायातून बाहेर पडावं लागलं. त्यानंर त्याच्या घराची परिस्थिती हळूहळू खालावत गेली.''

''त्यानंतर त्याचे वडील चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. ते उत्तम नाच करायचे. पण त्यावेळी त्यांना पुरेसे पैसे मिळत नव्हते. म्हणून रक्षित एका कपडे शिवण्याच्या दुकानात कामाला जात होता.''

''या सगळ्यात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होत गेली. त्यामुळे वैतागलेल्या रक्षितनं आत्महत्येचा विचार केला.कारण आत्महत्या केली तर माझ्या पश्चात माझ्या कुटुंबाला फेडरेशन मधून ५० हजार रुपये मिळतील. ज्यामुळे कुटुंबावरचा बरंच आर्थिक ताण कमी होईल.''

'हाच विचार मनात घेऊन रक्षितने निर्णय पक्का केला आणि उधरीची सायकल घेऊन तो चेन्नईच्या मरीना बीच वर आत्महत्या करण्यासाठी गेला. पण आत्महत्या करताना मनात विचार आला की माझ्या जाण्यानंतर मी ज्याची सायकल घेतली आहे, तो जर घरी सायकल मागायला आलं तर काय होईल.. म्हणून तो पुन्हा घराकडे वळला.''

''घरी जाऊन बघतो तर काय, त्याच्या वडिलांना एका चित्रपटात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम मिळालं होतं. त्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती बरीच बदलत गेली,'' असं रक्षित एका मुलाखतीत म्हणाला होता.

टॅग्स :rrr movieoscarOscars