"नच बलिये'तील जोडीला "दबंग-3'मध्ये नृत्याची संधी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

"नच बलिये-9'चा निर्माता असलेल्या सलमान खान या कार्यक्रमातील एका जोडीला "दबंग-3'मध्ये एका आयटम सॉंगवर नृत्याची संधी देणार आहे. यामध्ये सलमान व सोनाक्षी सिन्हा हेच नायक-नायिकेच्या भूमिकेत असून, नर्तक व अभिनेता प्रभुदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

सुपरस्टार सलमान खान ऊर्फ चुलबुल पांडे लवकरच "दबंग-3' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात तो एका खास आयटम सॉंगमध्ये "नच बलिये-9' मधील एका जोडीला नृत्याची संधी देणार आहे. "दबंग'मधील चुलबुल पांडेच्या करामतींमुळे हा चित्रपट लोकप्रिय झालाच, पण आतापर्यंतच्या दोन्ही "दबंग'मधील आयटम सॉंगनी लोकप्रियतेचे उच्चांक मोडले. पहिल्या "दबंग'मधील "मुन्नी बदनाम हुई' हे गाणे प्रचंड गाजले, तर दुसऱ्या "दबंग'मधील "फेव्हिकॉल' या गाण्याने लोकप्रियतेचे उच्चांक निर्माण केले.

आता "नच बलिये-9'चा निर्माता असलेल्या सलमान खान या कार्यक्रमातील एका जोडीला "दबंग-3'मध्ये एका आयटम सॉंगवर नृत्याची संधी देणार आहे. यामध्ये सलमान व सोनाक्षी सिन्हा हेच नायक-नायिकेच्या भूमिकेत असून, नर्तक व अभिनेता प्रभुदेवा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

"नच बलिये-9'मधील सर्वच स्पर्धक जोड्यांना पहिल्याच भागात सलमानशी गप्पा मारण्याची संधी मिळाली होती. आता यापैकी कोणती जोडी या स्पर्धेचा प्रतिष्ठेचा चषक जिंकेल; तसेच सलमानच्या चित्रपटात भूमिका रंगविण्याची संधी पटकाविते, त्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Nach Baliye" Winner Couple got chance to dance in "Dabangg-3"