esakal | गायक लकी अलीच्या निधनाच्या चर्चांवर मैत्रिणीचा खुलासा

बोलून बातमी शोधा

Lucky Ali
गायक लकी अलीच्या निधनाच्या चर्चांवर मैत्रिणीचा खुलासा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनारूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेकांनी कोरोना संसर्गामुळे आपला जीव गमावला आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांचादेखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशावेळी सोशल मीडियावर सध्या प्रसिद्ध गायक लकी अलीचा Lucky Ali कोरोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरत आहे. याबद्दल लकी अलीची मैत्रिण आणि अभिनेत्री नफीसा अलीने Nafisa Ali खुलासा केला आहे. नफीसाने एक ट्विट करून लकी अलीबद्दल लोकांना माहिती दिली. (Nafisa Ali quashes rumours of Lucky Ali death)

मंगळवारी कोरोनामुळे लकी अलीचं निधन झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत्या. त्याच्या अनेक चाहत्यांनी ट्विटरद्वारे त्याला श्रद्धांजली देखील वाहिली होती. परंतू त्याच्या निधनाचा ठोस पुरावा किंवा बातमी कुठेच नव्हती. यासर्वाचा खुलासा करत लकी अलीची मैत्रिण नफिसाने ट्विट केले, ‘लकी एकदम ठीक आहे आणि आज दुपारीच आमचे बोलणे झाले आहे. तो त्याच्या कुटुंबीयांसोबत फार्महाऊसवर वेळ घालवत आहे. त्याला कोरोना झालेला नाही आणि त्याची प्रकृती ठीक आहे.’

हेही वाचा : दीपिका पदुकोणला कोरोना; कुटुंबीयांना भेटायला गेली होती बेंगळुरूला

एका मुलाखतीमध्ये नफीसाने सांगितले, 'मी दिवसातून २ ते ३ वेळा लकीशी बोलले. तो ठिक आहे. त्याला कोरोना झालेला नाही. तो त्याच्या म्युझिक कॉन्सर्टच्या प्लॅनिंगमध्ये व्यस्त आहे. आम्ही व्हर्चुअल कॉन्सर्टबद्दल देखील बोललो होतो. तो बंगळूरुमध्ये फार्महाऊसवर आहे. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय देखील आहेत. मी काही वेळापूर्वीच त्याच्याशी बोलले आणि तो एकदम ठीक आहे.'

लकी अली त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करत होता. पण काही दिवसांपासून तो सोशल मीडियावर सक्रिय नव्हता. त्यामुळे त्याच्या या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. 'ओ..सनम', 'एक पल का जिना', 'सफर नामा' या लकी अलीच्या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.