नागाचैतन्य-समंथाच्या घटस्फोटावर नागार्जुन स्पष्टच बोलले, म्हणाले,'माझा मुलगा आता...' Nagarjuna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagarjuna react on naga chaitanya,samantha ruth prabhu divorce

नागाचैतन्य-समंथाच्या घटस्फोटावर नागार्जुन स्पष्टच बोलले, म्हणाले,'माझा मुलगा आता...'

Nagarjuna: साऊथ सुपरस्टार नागार्जुन सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचं यश एन्जॉय करत आहे. यादरम्यान मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत नागार्जुन यांनी मुलगा नागाचैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणाने संवाद साधला. घटस्फोट ही खूप वाईट गोष्ट आहे असं सांगत ते म्हणाले,''माझा मुलगा सध्या खूश आहे,बस्स मला इतकं माहीत आहे''. माहितीसाठी सांगतो की समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट ऑक्टोबर २०२१ मध्ये झाला होता. दोघांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना आपल्या घटस्फोटाविषयी सांगितले होते. आता दोघंही आपापल्या आयुष्यात पुढं जाताना दिसत आहेत.(Nagarjuna react on naga chaitanya,samantha ruth prabhu divorce)

हेही वाचा: नवरात्रीला गरबा क्वीन फाल्गुनीचं सरप्राइज...

काही दिवसांपूर्वी नागार्जुन यांना जेव्हा विचारलं गेलं की,'नागाचैतन्य-समंथा यांच्या घटस्फोटा संदर्भात कळलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं?' तेव्हा नागार्जुन म्हणाले,''माझा मुलगा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नागा यावेळी खूश आहे आणि मला त्याला असंच पहायचं आहे. मला फक्त इतकंच माहीत आहे. आणि माझ्यासाठी हेच महत्त्वाचं देखील आहे. त्याच्या आयुष्यात जे काही घडलं,तो त्याचा एक अनुभव होता. आणि खरं तर ती गोष्ट नागा-समंथा दोघांसाठी चांगली नव्हती. आता दोघांमधलं नातं संपलं आहे त्यामुळे आपण त्याला सारखं उगळणं योग्य नव्हे''.

हेही वाचा: नातीनेच केली 'बच्चन' कुटुंबाची पोलखोल

''आता पुन्हा कोणीही हा मुद्दा उगाचच काढू नये. आमच्या आयुष्यात ती गोष्ट आता संपली आहे,आणि मी आशा करतो आपण सगळे देखील ती गोष्ट आपल्या आयुष्यातूनही पुसून टाकाल. आता यापुढे आपण यावर न बोललेलं बरं''.

याआधी नागाचैतन्यला देखील समंथासोबतच्या घटस्फोटावरनं प्रश्न विचारला गेला होता,तेव्हा तो म्हणालेला की, मी आता कंटाळलो आहे,तेच तेच प्रश्न ऐकून. तो म्हणाला होता,''मला आणि समंथाला घटस्फोटाविषयी जे सांगायचे होते ते आम्ही सांगितले आहे. मी तर आता या एकाच प्रश्नाने वैतागलो आहे''.

हेही वाचा: अखेर श्रेयसचं स्वप्न साकार...

समंथाला तिच्या करिअरमध्ये यश मिळतंय हे पाहून नागाचैतन्यला आनंद होतोय हे देखील तो म्हणाला होता. समंथानं करणच्या चॅट शो मध्ये म्हटले होते की, तिला आणि तिच्या एक्स-हजबंड नागाचैतन्यला एका खोलीत बंद केले तर खोलीतील धारदार वस्तू लपवून ठेवाव्या लागतील. दोघांमध्ये गोष्टी इथवर बिघडल्या आहेत. पुढे भविष्यात दोघांमध्ये कसे संबंध असतील हे आपण स्वतः देखील सांगू शकत नाही असं देखील समंथा म्हणाली होती. समंथा आणि नागाचैतन्य यांनी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. पण लग्नाला ४ वर्ष होण्याआधीच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: Nagarjuna React On Naga Chaitanyasamantha Ruth Prabhu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..