...म्हणून आपले चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत टिकत नाही, जब्बार पटेल यांनी केला 'या' कारणांचा उलगडा

भारतीय चित्रपटांचा आशय दर्जेदार असतो. मात्र तांत्रिकदृष्या ते कमजोर असल्याने ऑस्करच्या स्पर्धेत ते टिकत नाही. त्यामुळे यावर चांगले काम होण्याची गरज व्यक्त करतानाच इतरही प्रमुख कारणांचा उलगडा आज ख्यातनाम दिग्दर्शक जब्बर पटेल यांनी केला.
Jabbar Patel
Jabbar Patel Esakal

Jabbar Patel in PIFF: भारतीय चित्रपटांचा आशय दर्जेदार असतो. मात्र तांत्रिकदृष्या ते कमजोर असल्याने ऑस्करच्या स्पर्धेत ते टिकत नाही. त्यामुळे यावर चांगले काम होण्याची गरज व्यक्त करतानाच इतरही प्रमुख कारणांचा उलगडा आज ख्यातनाम दिग्दर्शक जब्बर पटेल यांनी केला.

पुणे इंटनरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (पिफ)च्या नागपूर आवृत्तीचे उद्‍घाटन पीव्हीआर मॉलमधील सिनेपॉलिस येथे ‘डाहाका’ या पारंपारिक लोककलेच्या सादरीकरणाने शुक्रवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिफचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. ते म्हणाले, ऑस्करसाठी निवड करणाऱ्या परीक्षकांची भारतीय चित्रपटांबाबत एकच तक्रार असते, ती म्हणजे कॅमेरा आणि ध्वनी. (Latest Marathi News)

अलीकडे काही चित्रपट ऑस्करच्या दारावर जाऊन परत आले. ही समाधानाची बाब असली तरी अद्याप आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. तंत्रज्ञानाने आपल्या चित्रपटांना अधिक संपन्न करण्यासाठी कॅमेरा आणि ध्वनी याकडे यापुढे अधिक लक्ष घालावे अशी सूचनाही त्यांनी केली.

Jabbar Patel
Devendra Jhajharia: देवेंद्र झाझरिया पॅरालिम्पिक समिती नवे अध्यक्ष; भाजपकडून नुकतंच मिळालंय लोकसभेचं तिकीट

मराठी चित्रपटसृष्टीने संपूर्ण देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागपूरकरांसाठी वेगवेगळ्या देशांतील सद्यस्थितीत दर्शवणारे चित्रपट नक्की दाखण्यात येतील. याकरिता वर्षातून किमान दोन ते तीन कार्यक्रम घेतल्यास तरुणांमध्ये चित्रपटाची मांडणी करण्याच्या ज्ञानात भर पडेल, असेही जब्बार पटेल म्हणाले. (Latest Marathi News)

कला क्षेत्रात संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या जोडीने अनोखे चित्रिकरण करून समाजातील सद्यस्थिती तरुणांना चित्रपटाच्या माध्यमातून मांडता यावी, या उद्देशाने दरवर्षी पिफचे आयोजन करण्यात येते. दिनांक ९ व १० मार्चला ‘पिफ’ अंतर्गत दहा जागतिक चित्रपट, दोन भारतीय चित्रपट, दोन मराठी चित्रपट आणि एक डॉक्युमेंटरी सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज मोहिते यांनी तर कार्यक्रमाची मुख्य भूमिका पिफच्या नागपूर आवृत्तीचे मुख्य संयोजक अजेय गंपावार यांनी मांडली.

Jabbar Patel
Raj Thackeray In Nashik: सत्ता हातात द्या मशिदीवरील सर्व भोंगे बंद करतो; राज ठाकरेंचे नाशिकमध्ये दमदार भाषण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com