'आपलं वय काय, आपण करतो काय!' भाईजानचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा |Naiyo Lagda Song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naiyo Lagda Song salman trolled

Naiyo Lagda Song : 'आपलं वय काय, आपण करतो काय!' भाईजानचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा

Naiyo Lagda Song Salman Khan Trolled : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान साठीच्या जवळ आला आहे. पण अजुनही त्याचा स्वॅग हा काही वेगळाच आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या अभिनेत्यानं त्याच्या व्यक्तिमत्वानं चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. त्याची स्टाईल, हटके अदा ही नेहमीच चाहत्यांना घायाळ करताना दिसते.सध्या सलमानचा किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील गाणे व्हायरल झाले आहे.

सलमान खानच्या नव्या नय्यो लगदा या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नेहमी प्रमाणे त्याच्या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. लाखो व्ह्युजही त्याला मिळाले आहे. मात्र जसं त्यावरुन सलमानवर चाहत्यांनी त्याचं कौतूक केलं आहे त्याचप्रमाणे दुसरीकडे त्याच्यावर नेटकऱ्यांनी टीकाही केली आहे. सलमान सोबत त्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री पुजा हेगडेही आहे.

Also Read - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

नय्यो लगदा गाण्यामध्ये सलमाननं जी हुक स्टेप केली आहे त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. काहींनी त्याला त्याच्या वयावरुन डिवचले आहे. तर काहींनी सलमान नेमका कोणत्या प्रकारची कवायत करतो आहे असा प्रश्नही त्याला विचारला आहे. आपलं वय काय आपण करतो काय असे विचारत हे नेमकं कोणत्या प्रकारचे मनोरंजन आहे असे प्रश्न नेटकरी विचारु लागले आहेत.

यापूर्वी किंग खान शाहरुखच्या पठाणमधून सलमान खानच्या टायगर चित्रपटाच्या पुढच्या भागाचे प्रमोशन करण्यात आले होते. त्यात सलमान आणि शाहरुखच्या जोडीला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला होता. त्यानंतर सलमानच्या या नव्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. दुसरीकडे सलमान खान आणि पूजा हेगडे यांच्यातील वाढती मैत्री ही बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय आहे.

सलमानलाही कधी असे वाटले नसेल की त्याला एका रोमँटिक गाण्यावरुन नेटकरी एवढ्या प्रमाणात ट्रोल करतील. भलेही त्या गाण्यातून ९० च्या दशकांतील बॉलीवूडची आठवण अनेकांना झाली असेल. मात्र त्यात सलमानच्या डान्सनं नेटकऱ्यांना कोड्यात टाकले आहे. गाणं चांगलं आहे. मात्र त्यात सलमानला ज्या स्टेप्स दिल्या आहेत त्यावरुन तो कुठेही डान्स करतो आहे असे वाटत नाही. अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.