Namrata Malla: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक! म्हणाली, 'कृपया प्रार्थना करा ते व्हेंटिलेटरवर'

Namrata Malla Father
Namrata Malla Father Esakal

Namrata Malla Father : भोजपुरी इंडस्ट्रीतील अतिशय बोल्ड अभिनेत्री नम्रता मल्ला आपल्या सौंदर्याने लाखो लोकांना घायाळ करत असते. तिचे व्हिडीओ आणि फोटो दररोज सोशल मीडियावर चर्चेत असतात. तिच्या चाहत्यांची संख्याही कमी नाही.

मात्र, यावेळी अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे नाही तर वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे, जे ऐकून तिचे चाहते देखील दुःखी होऊ शकतात. नम्रताने आपल्या वडिलांची प्रकृती खराब असल्याची माहिती दिली.

Namrata Malla Father
Arjun Rampal: लग्नाशिवाय पुन्हा होणार वडील! अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाने दिली दुसऱ्यांदा गुडन्यूज

नम्रता मल्लाचे वडील व्हेंटिलेटरवर आहेत. यकृताशी संबंधित समस्यांमुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी घाईगडबडीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. पोस्ट शेअर करताना नम्रताने याची माहिती दिली आहे.

नम्रता मल्ला जेनिथने वडील आणि आईसोबतचा फोटो शेअर करताना ही माहिती दिली. त्याबरोबर तिने लिहिले की, 'कृपया सर्वांनी माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. यकृत खराब झाल्याने ते व्हेंटिलेटरवर आहेत. बाबा लवकर बरे व्हा आणि घरी परत या.

Namrata Malla Father
Sheezan Khan in KKK 13: तुनिषा आत्महत्याप्रकरणात बाहेर आल्यानंतर शिजानला भेटला पहिला प्रोजेक्ट....

नम्रताची पोस्ट पाहून 'हिंमत ठेव ते लवकरच बरे होऊन घरी परत येईल', असं म्हणत सर्वच चाहते तिला धीर देत आहेत. भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाची ही पोस्ट समोर येताच चाहते घाबरले आणि या कठीण काळात तिला धीर देत आहेत. चाहत्यांसोबत तिचे काही मित्रही अभिनेत्रीला पांठिबा देत असून काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.

Namrata Malla Father
Moradabad Suicide: आणखी एका आत्महत्येने हादरली इंडस्ट्री! फॅशन डिझायनरचा आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

नम्रता अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत होती. पण त्याला प्रसिद्धी भोजपुरी स्टार खेसारी लाल यादवच्या दो घुंट या गाण्याने मिळाली. खेसारी आणि नम्रता यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आणि हे गाणे रातोरात हिट झाले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com