
Maharashtrachi Hasyajatra fame namrata sambherao: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'नम्रता संभेराव'. तिनं साकारलेली 'लॉली' असो, 'आई' असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले 'पावली' हे पात्र असो. तिच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला हसवलं आहे. मात्र आज नम्रता काहीशी भावनिक, काहीशी रोमॅंटिक झालेली दिसते कारण आज तिच्या नवऱ्याचा म्हणजे योगेश संभेरावचा वाढदिवस, त्या निमित्ताने नम्रताने एक पोस्ट शेयर केली आहे.
(Namrata Sambherao shared post for husband yogesh sambherao birthday )
नम्रता सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते. ती बऱ्याचदा तिच्या मुलासाठी म्हणजे रुद्राज साठी आणि आपल्या पती योगेशसाठी पोस्ट लिहीत असते. मध्यंतरी तिच्या लग्नाला 9 वर्षे पूर्ण झाली तेव्हाही तिने एक खास पोस्ट लिहिली होती. आज तिच्या पतीचा म्हणजे योगेशचा वाढदिवस. या निमित्ताने नवऱ्यासोबतचे काही खास फोटो शेयर करत, नम्रता एका गाण्याच्या माध्यमातून व्यक्त झाली आहे.
नम्रता म्हणते, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगी.. मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला.. तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला.. अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा.. तू असा जवळी रहा..' अशी पोस्ट तिने शेयर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि तिच्या चाहत्यांनी योगेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नम्रता आणि योगेश 2013 मध्ये विवाह बंधनात अडकले. ते एकमेकांना कॉलेज मध्ये असल्यापासून ओळखत होते. आधी मैत्री आणि मग प्रेम असा त्यांचा प्रवास आहे. नम्रताने वारंवार योगेश विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो प्रचंड सपोर्टीव्ह आहे. तिच्या पाठिंब्यामुळेच आज नम्रता ही सगळं करू शकली, असं ती मानते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.