
Namrta Shirodakar Birthday : 'तुझ्याशी लग्न करेन, पण तुला...' महेश बाबूनं नम्रता पुढे ठेवली होती अट
Namrata Shirodkar : प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर दिग्दर्शित वास्तव चित्रपटानं नम्रतानं केलेली भूमिका तिला स्टार अभिनेत्री बनवून गेली. संजय दत्तच्या पत्नीची भूमिका तिनं प्रभावीपणे साकारली होती. त्यानंतर नम्रतानं मागे वळून पाहिलं नाही. ती लाईमलाईटमध्ये चमकत राहिली. पण त्या एका प्रश्नानं नम्रताचं मिस युनिव्हर्स व्हायचं स्वप्न भंगलं होतं.
जब प्यार किसीसे होता है या चित्रपटातून नम्रतानं बॉलीवूडमध्ये डेब्यु केलं होतं. त्यानंतर तिनं काही चित्रपट केले मग ती बॉलीवूडमधून बाहेर पडली. तिनं टॉलीवूडचा स्टार अभिनेता महेश बाबूशी लग्न केलं आणि संसारात रमली. खरंतर सलमान खानसोबत करिअरला सुरुवात करणाऱ्या नम्रतानं महेश बाबुसमोर लग्नाची मोठी अट ठेवली होती. आज नम्रताचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयीच्या खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
Also Read - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
नम्रतानं बॉलीवूडपासून जेव्हा फारकत घेतली तेव्हा तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. असं काय झालं की तिनं बॉलीवूडपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. आताही नम्रता फार कमीवेळा चित्रपटांमध्ये दिसते. काही जाहिरातींमध्ये ती आहे. मात्र ओटीटीवरही तिनं येण्यास वेळ घेतल्याचे दिसून आले आहे. कच्चे धागे, वास्तव, पुकार, अलबेला, दिल विल प्यार व्यार सारख्या चित्रपटांमध्ये नम्रताची भूमिका चाहत्यांना भावली.
२००० मध्ये तिनं तेलुगू फिल्म वामसीमध्ये काम केले होते. त्यावेळी तिची महेश बाबूसोबत ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमातही पडले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. २००५ मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नानंतर नम्रतानं आपल्या बॉलीवूडच्या करिअऱला रामराम केले होते. त्यानंतर १७ वर्षानंतर तिनं मोठा खुलासा केला.
हेही वाचा: Nora Fatehi : 'नोरा जॅकलीनवर जळायची!' मला म्हणायची, 'तू तिला...' सुकेशचा धक्कादायक खुलासा
नम्रतानं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, महेशनं माझ्यासमोर मोठी अट ठेवली होती. ती मला मान्य करावी लागली. त्याचे म्हणणे होते की, मला जर त्याच्याशी लग्न करायचे असेल तर मला अॅक्टिंग हे माझं करिअर सोडावे लागेल. त्याला वर्किंग वाईफ नको होती. हे त्यानं सुरुवातीला क्लिअर केले होते. नम्रतानं देखील महेश बाबुसमोर काही अटी ठेवल्या होत्या.
हेही वाचा: SS Rajamouli : अवतारचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांची राजामौलींना मोठी ऑफर, 'तुम्ही आता...'