'लाल बत्ती'मध्ये झळकणार नाना पाटेकर, साकारणार 'ही' दमदार भूमिका

प्रकाश झा यांच्या 'लाल बत्ती' या वेब सिरिज मध्ये नाना पाटेकर महत्वाच्या भूमीत दिसणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाली.
Nana Patekar confirms he's working in Prakash Jha's next 'Laal Batti'
Nana Patekar confirms he's working in Prakash Jha's next 'Laal Batti' sakal

nana patekar : बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा आगळा वेगळा ठसा उमटविणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर, केवळ अभिनय, संवाद फेकीच्या जोरावर या (Nana Patekar) अभिनेत्यानं बॉलीवूडमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रस्थापित बॉलीवूड कलाकारांच्या तुलनेत सौंदर्याच्या, देखणेपणाच्या व्याख्येत न बसणारे नाना हे कायमच त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांच्या (entertainment news) चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्गही तुफान आहे. नानांचा चित्रपट आवर्जुन पाहणारा खास प्रेक्षक आहे. नाना आता कोणत्या कलाकृतीत झळकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अखेर ही बाब समोर आली आहे. (Nana Patekar confirms he's working in Prakash Jha's next 'Laal Batti')

नाना एका हिंदी चित्रपटात काम करत असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच 'द कन्फेशन' नावाच्या एका सामाजिक थरार असलेल्या चित्रपटात नाना प्रमुख भूमिका सकरणार असल्याचे बोलेले जात आहे. पण नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नाना पाटेकर हे प्रकाश झा यांच्या 'लाल बत्ती' या सामाजिक-राजकीय वेब सिरिजमध्ये झळकणार आहेत. विशेष म्हणजे यावर स्वतः नानांनी शिक्कामोर्तब केली आहे.

प्रकाश झा आणि नाना बऱ्याच वर्षांनी एकत्र काम करत आहेत. 2010 मध्ये आलेल्या राजनिती या चित्रपटात नाना होते. याशिवाय रणबीर कपूर, अजय देवगण, नसीरुद्दीन शाह, मनोज बाजपेयी आणि कतरिना कैफ असे दिग्गज कलाकारही यात होते. त्यानंतर तब्बल १२ वर्षांनी ते एकत्र काम करत आहेत. याबाबत स्वतः नानांनीही एका माध्यमाला माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 'लाल बत्ती' या वेब सीरिज आहे नाना एका राजकारण्याची भूमिका साकारणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com