Nana Patekar: "त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा..", नाना पाटेकर यांचा भाजपला टोला

Nana Patekar On Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh:
Nana Patekar On Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh: Esakal

Nana Patekar On Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh: गेल्या काही दिवसापासून शिवरायांनी वापरलेली वाघनखं ही भारतात परत आणण्याच्या चर्चा सुरु आहेत. ही वाघनखं सध्या ब्रिटनमध्ये आहेत. आधी शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखं परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

नुकतच राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत घोषणा केली होती. जगदंबा तलवार पाठोपाठ आता शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असे त्यांनी सांगितले.

Nana Patekar On Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh:
Shahrukh Khan Trolled: "अरे तुला काही लाज...", जवान सुपरहिट झाला पण शाहरुख का होतोय ट्रोल?

शिवरायांनी अफझल खान वधाच्या वेळी वापरलेली वाघनंखं परत मिळावीत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा सुरू असून लवकरच बैठक होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.

सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराज यांच्या भवानी तलवारीबद्दल देखील अशाच घोषणेनंतर आता मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी केलेल्या एका ट्विटची खुपच चर्चा रंगली आहे.

नाना पाटेकर हे त्यांच्या वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. ब्रिटनमधून वाघनखे आणण्यावरून टिप्पणी करतांना नाना पाटेकर यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

अशातच वाघनंखासंबधित त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलयं की, "मुनगंटीवार महाराजांची वाघनख आणताय त्या बद्दल अभिनंदन...जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा...."

छत्रपती शिवाजी महाराज यांनी या वाघनखांचा वापर करत अफजल खानाचा वध करत त्याचा कोथळा बाहेर काढला.

आजही ही वाघनखं भारतीयांसाठी खास आकर्षण आहे. लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली जी लवकरच भारतात येणार आहे यासाठी सर्वच लोक उत्सुक आहेत.

मात्र याच वाघनखांचे उदाहरण देत आता नानांनी सरकारवर टीका केली आहे. ज्याप्रकारे शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला तसाच आता या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढावा असं नाना पाटेकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नेटकरीदेखील त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Nana Patekar On Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh:
Akshay kumar In Mahakal: वाढदिवसानिमित्त अक्षय सहकुटुंब पोहचला महाकाल दरबारात! क्रिकेटर शिखर धवनचीही हजेरी

नाना पाटेकर हे चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहेत आणि हे नाकारता येणार नाही. हिन्दी, मराठी, नाटक, चित्रपट अशा अनेक माध्यमातून त्यांनी आपली अभिनयाची कारकीर्द संपन्न केली आहे. त्यांचे आज लाखों चाहते आहेत शिवाय त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com